3 वर्षांच्या चिमुरडीच्या नावावर अनेक विक्रम, मांटुग्यातील समर्थाची थक्क करणारी कामगिरी, VIDEO

Last Updated:

samartha sakrloa - समर्था सक्रोला या चिमुकलीचा जन्म 26 ऑगस्ट 2021 रोजी झाला. समर्थाची प्रतिभा तिच्या जन्मापासूनच दिसू लागली. जेव्हा ती 2 महिने 5 दिवसांची होती, तिच्या शरीराचे हात आणि पाय सतत हालचाल करत होते. तसेच चेहऱ्यावरील हावभाव सतत बदलत राहिले.

+
समर्था

समर्था महालक्ष्मी सक्रोला

प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी
मुंबई - माटुंग्यातील लेबर कॅम्पमधील 3 वर्षाच्या समर्था महालक्ष्मी सक्रोला या चिमुरडीने शिक्षण श्रेणीमध्ये सर्वात कमी वयात अनेक इतिहास रचले आहेत. तसेच कमी वयात अनेक पुरस्कार सुद्धा मिळवले आहेत. तिने नेमके कोणते विक्रम केले आहेत, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला आढावा.
समर्था सक्रोला या चिमुकलीचा जन्म 26 ऑगस्ट 2021 रोजी झाला. समर्थाची प्रतिभा तिच्या जन्मापासूनच दिसू लागली. जेव्हा ती 2 महिने 5 दिवसांची होती, तिच्या शरीराचे हात आणि पाय सतत हालचाल करत होते. तसेच चेहऱ्यावरील हावभाव सतत बदलत राहिले.
advertisement
यानंतर ती जसजशी मोठी होत गेली, तसतशी प्रत्येक महिन्याला तिच्यातील समजूतदारपणा, तसेच काही ना काही वेगळेपण दिसून येत होते. तिच्यातील हे सर्व टॅलेंट पाहून तिच्या आईने तिला 5 महिन्यांची असताना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
थक्क करणारी कामगिरी -
यानंतर समर्थाने ऑनलाईन स्पर्धेत राष्ट्रगीत, ए टू झेड अल्फाबेट, अवयवांची नावे, 10 फळे, 5 भाज्या, वाहनांची नावे, 14 प्राण्यांची नावे, 2 इंग्रजी कविता, 6 पक्षांची नावे, भारतीय चलनातील नोटा आणि कॉइन, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय फळाच्या नावासह राष्ट्रीय फुलाचे नाव झटपट बोलून दाखविले.
advertisement
या पुरस्काराने सन्मानित -
तिचे थक्क करणारे टॅलेंट पाहून आयडब्लूआरने इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिचे नाव नोंदविले गेले. याचबरोबर प्रोफाइल ऑफ इंटरनॅशनल टॅलेंट अँड इंटेल लॅक्टऊल्स आणि इंडियास वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार, असे अनेक पुरस्कार समर्थाला मिळाले आहेत. याचसोबत महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा समर्थाला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारतातील सर्वात तरुण प्रभावशाली नॅशनल आयकॉन अवॉर्डनेही समर्थाला सन्मानित करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
3 वर्षांच्या चिमुरडीच्या नावावर अनेक विक्रम, मांटुग्यातील समर्थाची थक्क करणारी कामगिरी, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement