तुमचंही घराचं स्वप्न साकार होणार! MHADA चा मोठा निर्णय, राज्यात बांधणार तब्बल इतकी घरं!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
MHADA : आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. MHADA 2025-26 या वर्षात 19 हजार 497 घरे बांधणार आहे.
मुंबई : म्हाडाच्या 2025-2026 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण गृहनिर्माण योजना उभारली जात आहे. राज्यभरात 19,497 घरांची बांधणी करण्याचे उद्दिष्ट ठेवत म्हाडाने 9,202 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये नवीन घरांची उभारणी होणार आहे, ज्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सुलभ दरात घर मिळविण्याची संधी मिळेल.
मुंबई व प्रमुख शहरांमध्ये घरबांधणीला चालना
मुंबई मंडळांतर्गत 5,199 घरे बांधण्याचे नियोजन असून त्यासाठी 5,749.49 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कोकण मंडळासाठी 9,902 घरांसाठी 1,408.85 कोटी, पुणे मंडळासाठी 1,836 घरांसाठी 585.97 कोटी, नागपूर मंडळासाठी 692 घरांसाठी 1,009.33 कोटी आणि छत्रपती संभाजीनगर मंडळासाठी 1,608 घरांसाठी 231.10 कोटी रुपयांची तरतूद आहे.
advertisement
पुनर्विकास प्रकल्पांसाठी भरघोस निधी
1) वरळी, नायगाव, परळ बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी 2,800 कोटी रुपये
2) जोगेश्वरी पूर्व पीएमजीपी कॉलनी पुनर्विकासासाठी 350 कोटी रुपये
3) वांद्रे पश्चिम परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी 205 कोटी रुपये
4) गोरेगाव सिद्धार्थ नगर येथे सदनिका उभारणीसाठी 573 कोटी रुपये
5) परळ जिजामाता नगर येथे वसतिगृह उभारणीसाठी 20 कोटी रुपये
advertisement
6)गिरणी कामगारांसाठी घरकुलांसाठी 57.50 कोटी रुपये
7) बोरीवली येथील योजनेसाठी 200 कोटी रुपये
विशेष प्रकल्पांसाठी तरतूद
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसन प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये, पहाडी गोरेगाव प्रकल्पासाठी 177.79 कोटी रुपये, मालवणी झोपडपट्टी सुधार प्रकल्पासाठी 50 कोटी रुपये, मागाठाणे बोरीवली योजनेसाठी 85 कोटी रुपये, एक्सर बोरीवली तटरक्षक दल योजनेसाठी 30 कोटी रुपये आणि गोरेगाव सिद्धार्थ नगर पुनर्विकासासाठी 20 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
advertisement
ठाणे आणि विरारसाठी महत्त्वाचे उपक्रम
पाचपाखाडी-ठाणे येथे हेल्थ केअर सेंटर आणि निवासी घरांसाठी 15 कोटी रुपये, माजिवाडे-ठाणे येथे 100 बेडचे वृद्धाश्रम आणि महिलांसाठी वसतिगृहासाठी 30 कोटी रुपये, विरार बोळींज येथे क्लब हाऊस, जलतरण तलाव आणि भूखंड विकासासाठी 33.85 कोटी रुपये आणि वर्तकनगर-ठाणे पोलीस वसाहत पुनर्विकासासाठी 90 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
advertisement
इतर विशेष योजनांमध्ये गोठेघर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) साठी 115 कोटी रुपये, चंद्रपूर विशेष नियोजन प्राधिकरण योजनेसाठी 371.20 कोटी रुपये आणि टेक्सटाइल पार्क एम्प्रेस मिल योजनेसाठी 350 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यात घरकुलांची उभारणी आणि पुनर्विकासाला गती देण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 01, 2025 1:20 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
तुमचंही घराचं स्वप्न साकार होणार! MHADA चा मोठा निर्णय, राज्यात बांधणार तब्बल इतकी घरं!