MHADA Lottery: जास्त विचार करू नका! वेळ कमी उरलाय, म्हाडानं जाहीर केली अर्ज भरण्याची शेवटची तारीख

Last Updated:

MHADA Lottery: स्वस्तातलं हक्काचं घर खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाने अर्ज करण्याची अंतिम मुदत जाहीर केली आहे.

MHADA Lottery: जास्त विचार करू नका! वेळ कमी उरलाय, म्हाडानं जाहीर केली अर्ज भरण्याची शेवटची तारीख
MHADA Lottery: जास्त विचार करू नका! वेळ कमी उरलाय, म्हाडानं जाहीर केली अर्ज भरण्याची शेवटची तारीख
मुंबई: सर्वसामान्यांना हक्काच्या घराचं स्वप्न साकार करण्याची शेवटची संधी आहे. कोकण मंडळाने स्वस्तातल्या पाच हजार 257 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू केली आहे. या लॉटरी प्रक्रियेला भरघोस प्रतिसाद मिळत असून 14 दिवसांत तब्बल 21 हजार 951 जणांनी ऑनलीन अर्ज केला आहे. तर 9 हजार 236 जणांनी अनामत रक्कम देखील भरली आहे. आता अर्ज करण्यासाठी 16 दिवसांची मुदत बाकी असून इच्छुकांना 13 ऑगस्टपूर्वी अर्ज करावा लागणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाने जाहीर केलेल्या लॉटरी प्रक्रियेत सर्वसामान्यांना स्वस्तात घर मिळणार आहे. लॉटरीत अत्यल्प म्हणजे वार्षिक सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गटासाठी तब्बल चार हजार 802 घरे राखीव आहेत. तसेच नऊ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न गटातील कुटुंबासाठी 455 घरे राखीव आहेत. अर्ज प्रक्रियेला 14 जुलैपासून सुरुवात झाली असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
13 ऑगस्टपर्यंत मुदत
म्हाडा लॉटरीसाठी 14 दिवसांत 21 हजार 951 हून अधिक जणांचे ऑनलाईन अर्ज आले आहेत. या लॉटरीसाठी 13 ऑगस्ट ही अंतिम मुदत असणार आहे. सध्या म्हाडाकडे आलेल्या अर्जंत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठीचे सर्वाधिक अर्ज आहेत.
दरम्यान, म्हाडाच्या विकासकांकडून लॉटरी विजेत्यांना घराचा ताबा देताना मुळ किमतीशिवाय विविध शुल्क आकारले जाते. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या सुरक्षा व दक्षता विभागाने परिपत्रक काढून कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery: जास्त विचार करू नका! वेळ कमी उरलाय, म्हाडानं जाहीर केली अर्ज भरण्याची शेवटची तारीख
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement