मुंबई काँग्रेसमध्ये बंडाळी माजणार, बडा नेता पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
सायनमधून काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे नेते आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा नाराज आहेत.
मुंबई : मुंबई काँग्रेसचे बडे नेते रवी राजा पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. रवी राजा हे सायनमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र पक्षाने संधी नाकारल्याने रवी राजा काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. रवी राजा मुंबई काँग्रेसमधील मोठे नेते आहेत.
सायनमधून काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे नेते आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा नाराज आहेत. येत्या दोन दिवसांत रवी राजा काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
रवी राजा हे सायनमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. रवी राजा हे सायनमधून पाचवेळा नगरसेवक राहिले आहेत. तर पाच वर्षे त्यांनी मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले. विधानसभेच्या तोंडावर त्यांचा पक्षत्याग नक्कीच पक्षाला परवडणारा नाही, असे राजकीय जाणकार सांगतात
advertisement
महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मुंबईतील जागा-वाटपावरून जोरदार संघर्ष सुरू आहे. एकेएका जागेवरून दोन्ही पक्षात चुरस आहे. अशावेळी इच्छुक अनेक पण जागा एक अशी स्थिती असल्याने पक्षनेतृत्वासमोर उमेदवारी कुणाला द्यायची, हा प्रश्न आहे.
काँग्रेसची दुसरी यादी जाहीर
काँग्रेसने ४८ जणांची पहिली यादी केल्यानंतर शनिवारी २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत नागपूरसह मुंबईच्या तीन जागांचा देखील समावेश करण्यात आला आहे. सायन कोळीवाड्यातून गणेश यादव, चारकोपमधून यशवंत सिंग तर तर कांदिवली पूर्वमधून काळू बधेलिया यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
advertisement
मुंबई काँग्रेसमध्ये पडझड
view commentsगेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई काँग्रेसमध्ये पडझड सुरू आहे. सुरुवातीला संजय निरूपम, लोकसभेच्या तोंडावर मिलिंद देवरा आणि त्यानंतर बाबा सिद्धिकी यांच्या एकामागून एक पक्षत्यागाने मुंबई काँग्रेस अक्षरश: खिळखिळी झाली. लोकसभा निवडणूक काळात तिन्ही प्रमुख नेत्यांनी राजीनामा दिल्याने मुंबई काँग्रेसला धक्के बसले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 26, 2024 1:04 PM IST









