'500 रुपयांत शरीरसंबंध', तरुणीसोबत केलेला सौदा अंगलट, मुंबईतील युवकासोबत घडलं भयंकर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईच्या गिरगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाला अनोळखी वेश्या महिलेवर विश्वास ठेवणं चांगलंच महागात पडलं आहे.
मुंबई: मुंबईच्या गिरगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाला अनोळखी वेश्या महिलेवर विश्वास ठेवणं चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित वेश्येनं तरुणाला आपल्या जाळ्यात गुंतवून त्याची तब्बल ३५ हजार रुपयांची लूट केली आहे. आरोपी महिला पीडित तरुणाला गोड बोलून एका लॉजवर घेऊन गेली. याठिकाणी तिने आरोपी महिलेसह इतर तीन महिलांनी मिळून तरुणाला ब्लॅकमेल केलं. यानंतर त्याच्याकडून तब्बल ३५ हजार रुपये उकळले आहेत.
हा प्रकार घडल्यानंतर तरुणाने व्ही पी रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. तसेच फसवणूक करणाऱ्या तीन महिलांना अटक केली. माजिदा नूर सरदार गाझी, रुपा विश्वनाथ दास, नसिम्मा जमान शेख असं अटक केलेल्या आरोपी महिलांची नावं आहेत. तिघींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ सप्टेंबर रोजी घडली. घटनेच्या वेळी तक्रारदार तरुण सीएसएमटी रेल्वे स्थानकावर होता. यावेळी एका अनोळखी महिलेने त्याच्याशी संवाद साधला. शरीरसंबंध ठेवण्याचं आमिष दाखवलं. केवळ ५०० रुपयांमध्ये शरीरसंबंध ठेव, असं महिलेनं तक्रारदाराला सांगितलं. दोघांमध्ये तसा व्यवहार ठरला. पण हा सौदा तरुणाच्या अंगलट आला.
तरुण शरीरसंबंधासाठी राजी झाल्यानंतर आरोपी महिलेनं तक्रारदाराला टॅक्सीमध्ये बसवून पठ्ठे बापूराव मार्गावरील भारत भवन हॉटेलजवळील इमारतीमध्ये घेऊन गेली. त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत नेल्यानंतर, ती महिला आणि तिच्यासोबत आणखी तीन महिलांनी खोलीत प्रवेश करून तक्रारदाराला धमकावले. त्याचे अश्लील व्हिडीओ काढत त्यांनी बदनामीची भीती दाखवली. तक्रारदाराच्या मोबाइलमधून २२ हजार ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले, तसेच १३ हजार रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. या प्रकारानंतर तक्रारदाराने पोलिसांत तक्रार केली असून, पोलिसांनी आरोपी महिलांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 7:45 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
'500 रुपयांत शरीरसंबंध', तरुणीसोबत केलेला सौदा अंगलट, मुंबईतील युवकासोबत घडलं भयंकर