'माझं तुझ्यावर प्रेम, लग्न करायचंय', मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरकडून डोंबिवलीतील महिलेवर अत्याचार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरने एका महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरने एका महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून आरोपीनं अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पण ज्यावेळी या अनैतिक संबंधाची माहिती आरोपी डॉक्टरच्या पत्नीला समजली, तेव्हा त्याने पीडित महिलेला फोनवरून 'माझी चुकी झाली, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही' असं सांगितलं. या प्रकरणी महिलेनं मानपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. एका प्रसिद्ध डॉक्टरने अशाप्रकारे लग्नाचं आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५२ वर्षीय आरोपी डॉक्टर हा अस्थिरोग तज्ज्ञ असून तो मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात काम करतो. तसेच तो ठाण्यातील रुग्णालयात देखील मानद सेवा देतो. पीडित महिला ही देखभाल दुरूस्तीचं काम करते. २०२३ ते २०२४ या कालावधीत आरोपीनं अनेकदा पीडित महिलेचं लैंगिक शोषण केलं आहे. आरोपीनं आपण आपल्या पत्नीला लवकरच घटस्फोट देणार आहे. त्यानंतर आपण दोघं लग्न करू. माझं आणि माझ्या पत्नीचं पटत नाही, असं म्हणत आरोपीनं पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले.
advertisement
पीडित महिलेनं मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती हृदयरोगाने ग्रस्त होता. तसेच त्यांच्या पायाला गँगरीन झालं होतं. यामुळे त्यांनी ठाण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात आपल्या पतीला उपचारासाठी दाखल केलं होतं. यावेळी तेथील डॉक्टरने पतीचे पाय गुडघ्यापासून खाली कापावे लागतील, असं सांगितलं.
यासंदर्भातची यशस्वी शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ज्ञ असलेल्या आरोपी डॉक्टरने केली. त्यानंतर या डॉक्टरशी महिलेचा पतीच्या रुग्ण सेवेच्या माध्यमातून संबंध आला. पतीचे औषधोपचार, काही मार्गदर्शनासाठी पीडित महिलेने संपर्क केला की संबंधित डॉक्टर पीडित महिलेच्या डोंबिवलीतील घरी येऊन पतीला तपासून निघून जात होते. पतीची तब्येत खालावल्याने २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले.
advertisement
त्यानंतर संबंधित अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर आपल्या तब्येतेची नियमित विचारपूस करायचे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलाला घरी येऊन दोन ते तीन तास मार्गदर्शन करायचे. त्या निमित्ताने घरी चहा, भोजन त्यांचे व्हायचे. आपला मुलगा बाहेरगावी शिक्षण घेत आहे याची माहिती डॉक्टरांना होती. एक दिवस मी घरी एकटी असताना डॉक्टरांनी आपणास काही बोलायचे आहे असे बोलून ‘माझ तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्यासोबत राहायचे आहे. माझे आणि पत्नीचे पटत नाही. मी लवकरच तिला घटस्फोट देणार आहे’ असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्याशी आपल्या मनाविरूध्द जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असे तक्रारीत आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
October 02, 2025 9:11 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
'माझं तुझ्यावर प्रेम, लग्न करायचंय', मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरकडून डोंबिवलीतील महिलेवर अत्याचार