Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग ओंकार हत्ती, वाहतुकीवर झाला मोठा परिणाम, परिसरात उडाली खळबळ
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
महाराष्ट्राच्या सीमेवर बागायतींचं नुकसान करणारा ‘ओंकार’ नावाचा हत्ती आता इन्सुली भागात दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक शनिवारी सायंकाळी आणि रविवारी सकाळी काही तास ठप्प झाली. विशेष म्हणजे यामागचं कारण ना दरड कोसळणं, ना अपघात… तर एक हत्ती! गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बागायतींचं नुकसान करणारा ‘ओंकार’ नावाचा हत्ती आता इन्सुली भागात दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
शनिवारी सायंकाळी ‘ओंकार’ अचानक इन्सुली गावाजवळच्या महामार्गावर आला. त्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली, त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबली. रविवारी सकाळी पुन्हा हा हत्ती त्याच भागात आला, ज्यामुळे पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. वनविभागाच्या पथकाने हत्तीला सुरक्षित मार्ग देण्यासाठी प्रयत्न केले, मात्र लोकांच्या गर्दीमुळे आणि वाहनांच्या रांगा लागल्याने विभागाला मोठी अडचण निर्माण झाली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, हा ‘ओंकार’ हत्ती सुमारे 22 वर्षांपूर्वी कर्नाटकातील दांडेली अभयारण्यातून बाहेर पडलेल्या हत्तींच्या कळपातील आहे. सध्या तो अंदाजे 10 ते 12 वर्षांचा असून गेल्या काही महिन्यांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग ते सावंतवाडी परिसरात फिरत आहे.
अलीकडेच त्याने कास, मडुरा, रोणापाल आणि आता इन्सुली या भागात वावर सुरू ठेवला आहे. या ठिकाणी त्याने काही ठिकाणी शेती व बागायतींचं नुकसान केल्याची माहिती आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वनविभागाचं पथक सध्या या हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून, त्याला सुरक्षित अधिवासाकडे परत पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
मुंबई-गोवा महामार्गावर ‘ओंकार’चा हा दुसरा प्रवेश ठरला असून, या घटनेमुळे परिसरातील वाहतुकीवर आणि नागरिकांच्या हालचालींवर मोठा परिणाम झाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2025 9:53 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग ओंकार हत्ती, वाहतुकीवर झाला मोठा परिणाम, परिसरात उडाली खळबळ


