Mumbai Local : मेट्रो विसरून जाल! हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत विस्तार; अवघ्या 20 रुपयांत मुंबईचे दोन टोक जोडणार
Last Updated:
Panvel To Borivali Direct Train : पनवेल ते बोरिवली हार्बर लाइनचा विस्तार सुरू आहे. प्रवाशांना आता फक्त 20 रुपयांत थेट लोकल मिळणार आहे.
मुंबई : वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे गोरेगावपर्यंत धावणाऱ्या हार्बर मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा विस्तार दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. या मार्गावर मालाड येथील एलिव्हेटेड स्थानकाचे काम चालू आहे. तसेच कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहावा रेल्वे मार्ग बांधण्याचे काम देखील सुरु आहे. या कामानंतर प्रवाशांना फक्त 20 रुपयांमध्ये पनवेल ते बोरिवली थेट प्रवास करता येणार आहे.
सीएसएमटी ते अंधेरीचा प्रवास संपला; हार्बर लोकल गोरेगावपर्यंत
सध्या हार्बर मार्गावर सीएसएमटी-पनवेल, अंधेरी, गोरेगावदरम्यान लोकल धावते. पूर्वी सीएसएमटी-अंधेरीदरम्यानच हार्बर सेवा होती. त्यामुळे अनेक प्रवासी सीएसएमटी ते अंधेरीपर्यंत प्रवास करून नंतर पश्चिम रेल्वेने पुढचा प्रवास करायचा. प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी हार्बर सेवेला गोरेगावपर्यंत वाढवले. हा विस्तार डिसेंबर 2017 पासून सुरू होण्याचे नियोजन होते पण तांत्रिक अडचणींमुळे मार्च 2019 पासूनच गोरेगावपर्यंत लोकल सुरू होऊ शकल्या.
advertisement
आता गोरेगावपर्यंतची सेवा यशस्वी ठरल्याने बोरिवलीपर्यंत विस्तारण्याचे ठरले आहे. हा प्रकल्प एमयूटीपी-3 ए अंतर्गत राबविण्यात येईल, आणि त्यासाठी अंदाजे 825 कोटींचा खर्च येणार आहे. विस्तार दोन टप्प्यांत होणार आहे - गोरेगाव ते मालाड 2 किमीचा पहिला टप्पा 2026-27 मध्येआणि मालाड ते बोरिवली 5 किमीचा दुसरा टप्पा 2027-28 मध्ये पूर्ण होईल.
advertisement
थेट सेवेमुळे प्रमुख स्थानकांवरील गर्दी आटोक्यात
हा विस्तार झाल्यानंतर पनवेल ते बोरिवली थेट लोकलने प्रवास करता येईल. यामुळे कुर्ला, दादर, वडाळा रोड स्थानकांवरील प्रवाशांचा ताण कमी होईल. तसेच प्रवाशांना थेट लोकल मिळाल्याने वेळेची बचत होईल आणि प्रवास अधिक सोयीस्कर बनेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 2:10 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : मेट्रो विसरून जाल! हार्बर रेल्वेचा बोरिवलीपर्यंत विस्तार; अवघ्या 20 रुपयांत मुंबईचे दोन टोक जोडणार










