क्रूरतेचा कळस! ताम्हिणी घाटात मित्राला संपवलं, पुण्यात त्याच्या कारच्या विक्रीचा सौदा; पण 'स्मार्ट वॉच'ने डाव उलटवला

Last Updated:

भोसरीतील आदित्य भगत याची हत्या केल्यानंतर आरोपी त्याची महागडी 'इनोव्हा क्रिस्टा' कार घेऊन पुण्यात आले होते.

ताम्हिणी घाटात मित्राला संपवलं (घटनास्थळावरील फोटो)
ताम्हिणी घाटात मित्राला संपवलं (घटनास्थळावरील फोटो)
पुणे : पुणे आणि रायगड जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या ताम्हिणी घाट हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आपल्याच मित्राची हत्या करून त्याची कार विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना बाणेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
कार विक्रीचा प्रयत्न अन् पोलिसांचा सापळा: भोसरीतील आदित्य भगत याची हत्या केल्यानंतर आरोपी त्याची महागडी 'इनोव्हा क्रिस्टा' कार घेऊन पुण्यात आले होते. बाणेर पोलीस ठाण्याचे अंमलदार प्रितम निकाळजे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती चोरीची कार विकण्यासाठी ननावरे पुलाजवळ आली आहे. पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि कारचा दरवाजा उघडून आत बसत असलेल्या अनिकेत वाघमारे याला रंगेहात पकडले.
advertisement
उडावाउडवीच्या उत्तरांनी फुटले बिंग: अनिकेत वाघमारे याच्याकडे कारच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अवघ्या काही तासांपूर्वी ताम्हिणी घाटात मित्राचा खून करून ही कार चोरल्याची कबुली दिली. आदित्य भगत याला महाबळेश्वरला फिरायला नेण्याच्या बहाण्याने नेऊन पैशांच्या वादातून त्याचा गळा आवळून आणि कोयत्याने वार करून खून केल्याचे त्याने मान्य केले.
advertisement
अशी उघड झाली मृताची ओळख: दुसरीकडे, ताम्हिणी घाटात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. मात्र, आदित्यच्या हातातील इलेक्ट्रॉनिक घड्याळाच्या तांत्रिक तपासणीमुळे माणगाव पोलिसांना मृताची ओळख पटवणे सोपे झाले. यामुळे गुन्हेगारांनी पुण्यात कार विकण्यापूर्वीच त्यांचे नाव पोलिसांच्या रेकॉर्डवर आले होते.
बाणेर पोलिसांनी अनिकेत वाघमारे आणि त्याचा साथीदार तुषार ऊर्फ सोन्या पाटोळे यांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी माणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
क्रूरतेचा कळस! ताम्हिणी घाटात मित्राला संपवलं, पुण्यात त्याच्या कारच्या विक्रीचा सौदा; पण 'स्मार्ट वॉच'ने डाव उलटवला
Next Article
advertisement
BMC Election: EVM बिघाड, मार्करच्या शाईपेक्षा मोठा गोंधळ, मुंबईतले मतदार संतापले, नेमकं घडलंय काय?
EVM बिघाड, मार्करच्या शाईपेक्षा मोठा गोंधळ, मुंबईतले मतदार संतापले, नेमकं घडलंय
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारांचा उत्साह

  • या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित

  • ईव्हीएम आणि मतदान केल्याच्या शाई पेक्षा मोठा घोळ

View All
advertisement