Diabetes Diet Coke : डायबेटिजच्या भीतीने नॉर्मल कोल्डड्रिंक सोडलं, डाएट कोक पिणं सुरू केलं; आता तेच बनलं डोकेदुखी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Diet Coke : डायबेटिज आहे किंवा होईल या भीतीने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हीही डाएट सोडा, डाएट कोक किंवा डाएट ड्रिंक पित असाल तर त्याचे हे दुष्परिणाम तुम्हाला माहिती हवेच.
कित्येक लोक आहेत ज्यांना डायबेटिज आहे किंवा काही लोक प्री-डायबेटिज म्हणजे ते डायबेटिजच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना डायबेटिज होण्याचा धोका आहे. अशा लोकांना ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवावी लागते. त्यामुळे त्यांचा आहारही तसाच असतो. ज्यामध्ये डाएट सोडा, डाएट ड्रिंक किंवा डाएट कोकचाही समावेश असतो. अशीच एक प्री-डायबेटिक व्यक्ती जिने ब्लड शुगर वाढू नये म्हणून नॉर्मल कोल्डड्रिंक सोडलं आणि डाएट कोक पिणं सुरू केलं. पण आता तेच त्याच्यासाठी डोकेदुखी ठरलं आहे.
advertisement
advertisement
तपासणीत डॉक्टरांना आढळलं की त्या आहार अनियमित होता, तो खूप वेळ बसून राहायचा, त्याला ताणतणावही खूप होता. त्यामुळे तो प्री-डायबेटिज स्टेज म्हणजे डायबेटिज होण्याच्या उंबरठ्यावरट होता. त्यात त्याला कोकचंही व्यसन. दिवसातून 3 कॅन तो पित असे. पण यामुळे त्याच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली. ब्लड शुगर वाढली म्हणून नेहमीच्या कोककडून डाएट कोककडे वळला आणि इथूनच सुरू झाली खरी समस्या.
advertisement
व्यक्ती डाएट कोक प्यायला की अर्ध्या तासाच्या आत त्याला डोकेदुखीचा त्रास होत होता, हे कसं काय? तर डॉक्टरांनी सांगितलं डाएट कोकमधील एस्पार्टम जे आर्टिफिशिअर स्विटनर आहे, ते ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवताना काही लोकांमध्ये विशेषत: जे दीर्घकाळ घेतात त्यांच्यात डोकेदुखी आणि मायग्रेनला कारणीभूत ठरू शकतं.
advertisement
एस्पार्टम शरीरात विघटित झालं की त्याचे घटक सेरोटोनिन आणि डोपामाइन यासारख्या मेंदूतील केमिकल जे मूड आणि वेदना कंट्रोल करतात, त्या केमिकलमध्ये अडथळा आणू शकतात. एस्पार्टममधील एक घटक फॉर्मल्डिहाइड जे काही संवेदनशील लोकांमध्ये ऍलर्जीक प्रतिक्रिया आणि डोकेदुखी निर्माण करतं असं आढळून आलं आहे. काही सिद्धांतानुसार ते मेंदूतील मज्जातंतू पेशींना जास्त उत्तेजित करतं ज्यामुळे मायग्रेन होऊ शकतं.
advertisement
काही चाचण्यांवरून असं दिसून आलं आहे की एस्पार्टममुळे काही लोकांमध्ये डोकेदुखी होऊ शकते, ज्यामध्ये मायग्रेनचा त्रास असलेल्यांना त्याची प्रतिक्रिया होण्याची शक्यता जास्त असते. एस्पार्टम कॉर्टिसॉल आणि फ्री रॅडिकल्स वाढवू शकते, ज्यामुळे मेंदूमध्ये ऑक्सिडेटिव्ह ताण वाढू शकतो, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. कधीकधी, ते रक्तवाहिन्या आकुंचन पावते, रक्त प्रवाह बदलतो आणि डोकेदुखी सुरू करते.
advertisement
आता जर तुम्ही झिरो कोक घेता तर याचा अर्थ तुमच्याकडे सुक्रालोज आहे, जे साखरेपासून बनवलेल्या शून्य-कॅलरी, कृत्रिम स्वीटनर आहे. पण ते रासायनिकरित्या सुधारित केले आहे ज्यामुळे शरीर ते ऊर्जेसाठी शोषून घेऊ शकत नाही. 2006 च्या एका रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार एका व्यक्तीच्या डाएटमधून सुक्रालोज काढून टाकल्यानंतर त्याचं माययग्रेन थांबलं.
advertisement
advertisement







