Mumbai Local: मध्य रेल्वेवर 'बर्निंग लोकल'चा थरार, आग लागल्याचा पहिला PHOTO समोर

Last Updated:

Mumbai Local Burning: मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकावर मोठी दुर्घटना टळली आहे. कुर्ला स्थानकाजवळ सायडिंगला उभ्या असलेल्या लोकलला मोठी आग लागली आहे.

Mumbai Local: मोठी दुर्घटना! मध्य रेल्वेवर बर्निंग ट्रेनचा थरार, मुंबईत लोकलला आग लागल्याची घटना कॅमेऱ्यात कैद
Mumbai Local: मोठी दुर्घटना! मध्य रेल्वेवर बर्निंग ट्रेनचा थरार, मुंबईत लोकलला आग लागल्याची घटना कॅमेऱ्यात कैद
मुंबई: मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकावर मोठी दुर्घटना टळली आहे. कुर्ला स्थानकाजवळ सायडिंगला उभ्या असलेल्या लोकलला मोठी आग लागली आहे. या आगीमुळे कुर्ला स्थानकावर मोठी दुर्घटना टळली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3 च्या पुढे उभी असलेली जुन्या लोकलला ही भीषण आग लागली होती. या आगीमुळे काही वेळेसाठी कुर्ला स्थानकावर भीतीचे वातावरण पसरले होते. इतरत्र लोकलमधून प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांनी व्हिडिओ शूट करत सोशल मीडियावर शेअर केलेली आहे. सायडिंगला उभ्या असलेल्या बर्निंग लोकलचा थरार प्रवाशांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
आगीची घटना कशी घडली?
कचरा उचलण्यासाठी वापरली जाणारी ती लोकल होती. संध्याकाळच्या वेळी सुरूवातीला सायडिंगला उभी असलेल्या लोकलमधून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. त्यानंतर काही वेळाने अचानक आग लागली. पहिले आग आटोक्यात येण्यासारखी होती. परंतू घटनास्थळी कोणीही नसल्यामुळे आगीच्या कवेत दोन डब्बे पोहोचले. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले होते. सायडिंगला उभ्या असलेल्या लोकलला आग असल्याची माहिती मिळताच, रेल्वे प्रशासनातील अधिकारी- कर्मचारी आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप ठोस माहिती समजू शकलेली नाही.
advertisement
Mumbai Local: मोठी दुर्घटना! मध्य रेल्वेवर बर्निंग ट्रेनचा थरार, मुंबईत लोकलला आग लागल्याची घटना कॅमेऱ्यात कैद
लोकल सेवा विस्कळीत
धुळ खात पडलेली ही लोकल गेल्या अनेक महिन्यांपासून उभी आहे. भंगारात काढलेल्या ह्या लोकलला कोणीही पाहत नव्हते. सायडिंगला उभी असलेल्या लोकलला कशी काय आग लागली? ही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. अचानक आग लागल्यामुळे काही वेळेसाठी लोकल सेवा ठप्प झालेली होती. फार वेळेसाठी लोकल सेवा ठप्प झालेली नव्हती. आग नियंत्रणात येताच मध्य रेल्वेकडून लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. रेल्वे सेवा सुरळीत सुरू असून अप आणि डाऊन मार्गावर जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल सेवा काही मिनिटांसाठी उशिराने धावत आहे. दरम्यान, लोकलला ही आग ऐन गर्दीच्या वेळेतच लोकलला आग लागल्यामुळे चाकरमान्यांचे घरी जाण्यासाठी प्रचंड हाल झाल्याचे दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मध्य रेल्वेवर 'बर्निंग लोकल'चा थरार, आग लागल्याचा पहिला PHOTO समोर
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement