Tejasvee Ghosalkar : 25 लाखावरून थेट 5 कोटी अन् 40 लाखांची कार, तेजस्वी घोसाळकरांकडे 'इतकी' आहे मालमत्ता

Last Updated:

तेजस्वी घोसाळकर यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून आता त्यांच्या संपत्तीचे विवरण समोर आलं आहे.त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती ही 5 कोटी 15 लाख असल्याची माहिती समोर आली आहे.

Tejasvee Ghosalkar Net Worth
Tejasvee Ghosalkar Net Worth
Tejasvee Ghosalkar Net Worth : दहिसरच्या प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या तिकीटावर मुंबई महापालिका निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या तेजस्वी घोसाळकर प्रचंड चर्चेत आहेत. तेजस्वी घोसाळकर यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून आता त्यांच्या संपत्तीचे विवरण समोर आलं आहे.त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती ही 5 कोटी 15 लाख असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रतिज्ञापत्रातून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी घोसाळकर यांनी कंम्प्युटर अॅप्लिकेशनमदून पदवी प्राप्त केली आहे.तर सन 2017 मध्ये त्यांच्याकडील मालमत्तेची किंमत 25 लाख 82 हजार रूपये होती. तर आता त्यांच्याकडे 5 कोटी 15 लाखाची मालमत्ता आहे. 85 लाख 52 हजार रूपये किमतीचे सोने आहे. आणि 40 लाखांची नवी कोरी गाडी घेतल्याची माहिती आहे.
advertisement

कोणाची किती संपत्ती वाढली?

शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची 2017 ला 1 कोटी 61 लाख 53 हजार रुपये संपत्ती होती. ती संपत्ती आता 5 कोटी 26 लाख झाली आहे.
advertisement
माजी महापौर श्रद्धा जाधव (वॉर्ड क्रमांक २०२) यांनी ज्यावेळेस 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली होती, त्यावेळी त्यांची एकूण मालमत्ता 44 कोटी होती. पण आता एका वर्षात ही संपत्ती 2 कोटीने वाढून 46 कोटी झाली आहे.
advertisement
माजी महापौर विशाखा शरद राऊत (प्रभाग क्र. १९१) यांची 2017 मध्ये 14 कोटी 37 लाख इतकी मालमत्ता होती.आता 8 वर्षात ही संपत्ती 7 कोटीने वाढून 21 कोटी 83 लाख झाली आहे.
यामिनी जाधव (प्रभाग २०९) यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांची संपत्ती 10 कोटी 10 लाख होती. ही संपत्ती 1 वर्षात 4 कोटीने वाढली आहे. त्यामुळे त्यांची एकूण मालमत्ता 14 कोटी 57 लाख झाली आहे.
advertisement
नील किरीट सोमय्या (प्रभाग क्र. १०७)यांची 2017 मध्ये 1 कोटी 99 लाख इतकी संपत्ती होती. ही संपत्ती 8 वर्षात 7 कोटीने वाढून 9 कोटी झाली आहे.
शैलेश फणसे यांच एकूण मालमत्ता 25 कोटी आहे.आणि दीप्ती वायकर यांची संपत्ती 22 कोटी 1 लाख 71 हजार आहे. समाधान सरवणकर यांची 2017 मध्ये ९ कोटी ४३ लाख संपत्ती होती. तर आता आता त्यांची संपत्ती ४६ कोटी ५९ लाख इतकी आहे.यशवंत किल्लेदार यांची एकूण मालमत्ता ७ कोटी ५ लाख आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Tejasvee Ghosalkar : 25 लाखावरून थेट 5 कोटी अन् 40 लाखांची कार, तेजस्वी घोसाळकरांकडे 'इतकी' आहे मालमत्ता
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement