Municipal Corporation Election : '24 तासात युतीबाबत निर्णय घ्या, नाहीतर...' शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला इशारा
- Reported by:Vijay Desai
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मिरा भाईंदरमध्ये उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांने भाजपाला थेट 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.जर ठरलेल्या वेळेत युतीबाबत स्पष्ट निर्णय न झाल्यास आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ,असा इशाराच एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांने भाजपला दिला आहे.
Mira Bhayandar Municipal Corportion 2026 : प्रतिनिधी, मिरा भाईंदर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरायला दोन दिवसाचा कालावधी शिल्लक असताना मिरा भाईंदरमध्ये जागावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत मोठा संघर्ष पेटला आहे. मिरा भाईंदरमध्ये उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांने भाजपाला थेट 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.जर ठरलेल्या वेळेत युतीबाबत स्पष्ट निर्णय न झाल्यास आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ,असा इशाराच एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांने भाजपला दिला आहे. त्यामुळे मिरा भाईंदरमधील राजकारण तापलं आहे.
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना युतीचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपाला थेट 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे ठरलेल्या वेळेत युतीबाबत स्पष्ट निर्णय न झाल्यास आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ, असा इशाराच सरनाईक यांनी दिला आहे.
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी युतीसाठी काही अटी मांडल्या होत्या. त्यामध्ये ‘शिवार गार्डन’ परत देणे आणि भाजपाचे जे कार्यकर्ते शिवसेनेत घेतले गेले आहेत, ते परत करणे या प्रमुख अटींचा समावेश होता.या संदर्भात बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, शिवार गार्डन ज्या वेळी देण्यात आले होते, त्या कागदपत्रांवर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याच सह्या आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर गैरसमज पसरवला जात आहे.भाजपाने मांडलेल्या अटी मान्य करण्यास आम्ही तयार आहोत, मात्र, “आमचे जे पदाधिकारी भाजपाने आपल्या पक्षात घेतले आहेत, ते आम्हाला परत देण्यात यावेत,” अशी स्पष्ट अट त्यांनी मांडली.
advertisement
दरम्यान, या घडामोडींमुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण तापले असून पुढील 24 तासांत भाजप काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून युती टिकणार की तुटणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
view commentsLocation :
Mira-Bhayandar,Thane,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 5:24 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Municipal Corporation Election : '24 तासात युतीबाबत निर्णय घ्या, नाहीतर...' शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला इशारा






