Mumbai Local Train : रांगेत उभं राहण्याची चिंता सोडा, मध्य रेल्वेवर तुमच्या मदतीसाठी खास सोय

Last Updated:

Mobile UTS Assistant service : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मोबाइल यूटीएस सहाय्यक सुरू केले गेले आहेत. प्रवाशांना रांगेत थांबवता न राहता तिकीट मिळेल.

News18
News18
मुंबई : मुंबई शहराची जीवनवाहिनी म्हणून लोकल ट्रेनची ओळख आहे. लोकल ट्रेनने प्रवास करायचा म्हटलं तर तिकीट काढणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, असे अनेक प्रवाशी आहे जे अजूनही लाबंच लांब रागेत उभं राहतात, याच समस्येवर तोडगा आता मध्य रेल्वेनी काढलेला आहे.
जाणून घ्या नवीन सुविधा कोणती?
लोकल ट्रेनचे तिकीट काढणे प्रवाशांसाठी अतिशय सोपे व्हावे यासाठी, यासाठी मध्य रेल्वेने आता नवीन सुविधा सुरू केली आहे. ती म्हणजे एटीव्हीएम, यूटीएस प्रणाली आणि मोबाइल यूटीएस सेवेनंतर आता मोबाइल यूटीएस सहाय्यक. पहिल्यांदा ही सुविधा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ही गेल्या 31 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.
नेमका कसा फायदा प्रवाशांना याचा होणार?
या सुविधेमुळे फक्त 13 दिवसांतच रेल्वेने 20.33 लाख रुपये महसूल मिळवला आहे. जेव्हा तिकीट काढण्यासाठी प्रवाशी लाईनमध्ये थांबतात तेव्हा तिकडे 3 सहाय्यक व्यक्ती असतात जे प्रवाशांना तिकीट काढून देतात आणि त्यांचा वेळ वाचवतात. ज्यांना ' एम-यूटीएस सहाय्यक' असे म्हणण्यात येत आहे.
advertisement
हे सहाय्यक त्यांच्या सोबत मोबाइल फोन आणि लहान तिकीट प्रिंटिंग मशीन घेऊन फिरतात. हे कर्मचारी होल्डिंग एरिया किंवा रेल्वे परिसरातील रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांकडे जातात आणि त्यांच्याकडून त्याना पाहिजे असलेल्या स्थानकाचे तिकीटाचे पैसे घेऊन तात्काळ तिकीट देतात. पर्यायी व्यवस्थेपद्धतीत त्यांना काउंटरमध्ये बसून तिकीट देण्याची परवानगी देखील आहे.
प्रवाशांना डिजिटल पेमेंट तसेच रोख रकमेने तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी तिकीट खरेदी अधिक सोपी आणि जलद झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसव्यतिरिक्त भारतीय रेल्वेने नवी दिल्ली, कोलकाता, बेंगलुरू आणि चेन्नई या प्रमुख स्थानकांवर देखील मोबाइल यूटीएस सहाय्यक सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचतो तसेच रांगा कमी होतात आणि तिकीट खरेदी अधिक सोयीस्कर बनते.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Train : रांगेत उभं राहण्याची चिंता सोडा, मध्य रेल्वेवर तुमच्या मदतीसाठी खास सोय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement