Mumbai : मुंबईत बसला होता मास्टरमाईंड, परदेशातून सुरू होती गोल्ड स्मगलिंग, इतकं सोनं पाहून पोलिसांचे डोळे विस्फारले!

Last Updated:

रेव्हेन्यू इंटेलिजन्स डायरेक्टरेट (DRI) च्या मुंबई झोनल युनिटने ऑपरेशन गोल्डन स्वीप राबवलं आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशी नागरिक, विमानतळ कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय सोने तस्करी टोळीच्या सदस्यांना अटक केली आहे.

मुंबईत बसला होता मास्टरमाईंड, परदेशातून सुरू होती गोल्ड स्मगलिंग, इतकं सोनं सापडलं की पोलिसांचे डोळे विस्फारले!
मुंबईत बसला होता मास्टरमाईंड, परदेशातून सुरू होती गोल्ड स्मगलिंग, इतकं सोनं सापडलं की पोलिसांचे डोळे विस्फारले!
विवेक गुप्ता, प्रतिनिधी
मुंबई : रेव्हेन्यू इंटेलिजन्स डायरेक्टरेट (DRI) च्या मुंबई झोनल युनिटने ऑपरेशन गोल्डन स्वीप राबवलं आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशी नागरिक, विमानतळ कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय सोने तस्करी टोळीच्या सदस्यांना अटक केली आहे. या ऑपरेशनमध्ये सुमारे 12.58 कोटी रुपयांच्या किंमतीचे 10.488 किलोग्रॅमचे 24 कॅरेट सोनं जप्त करण्यात आलं आहे.
advertisement
डीआरआयने गुप्त माहितीच्या आधारे संघटित सोने तस्करी टोळीचा पर्दाफाश केला आहे. या ऑपरेशनच्या अंतर्गत 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे, ज्यात 2 बांगलादेशी, 6 श्रीलंकन नागरिक, तसंच दोन विमानतळ कर्मचारी, दोन हँडलर आणि मुंबईस्थित एका मास्टरमाइंडचा समावेश आहे.

ट्रान्झिट प्रवाशांचा तस्करीसाठी वापर

ही आंतरराष्ट्रीय टोळी दुबईहून सिंगापूर, बँकॉक आणि ढाका येथे मुंबईमार्गे प्रवास करणाऱ्या ट्रान्झिट प्रवाशांचा वापर करून तस्करी नेटवर्क चालवत होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या प्रवाशांनी त्यांच्या शरीरात ओव्हल शेपच्या मेणाच्या कॅप्सूलमध्ये सोनं लपवलं होतं. मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर या ट्रान्झिट प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रस्थान क्षेत्रात तैनात असलेल्या सहयोगी विमानतळ कर्मचाऱ्यांना गुप्तपणे सोनं दिलं. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी विमानतळाबाहेर सोने बेकायदेशीरपणे हँडलर आणि रिसीव्हरकडे नेले, जे मास्टरमाइंडशी समन्वय साधत होते. हे रॅकेट मुंबई आणि दुबई येथील मास्टरमाइंड चालवत होते, ज्यामध्ये ट्रान्झिट प्रवासी, विमानतळ कर्मचारी, हँडलर आणि रिसीव्हर अनेक पातळ्यांवर होते.
advertisement
डीआरआयने त्यांच्या गुप्तचर क्षमतेचा वापर करून जलद कारवाई केली असली, तरी तस्करी सिंडिकेटच्या या पद्धतीमुळे संवेदनशील पायाभूत सुविधांमधला अंतर्गत धोका अधोरेखित झाला आहे. विमानतळ कर्मचारीही या नेक्ससमध्ये सहभागी असल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास डीआरआय करत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुंबईत बसला होता मास्टरमाईंड, परदेशातून सुरू होती गोल्ड स्मगलिंग, इतकं सोनं पाहून पोलिसांचे डोळे विस्फारले!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement