पालघरहून येतोय जनसागर, मुंबईची कोंडी होणार? वाहतुकीत मोठे बदल, ‘हा’ मार्ग बंद
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: लाँग मार्चदरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
मुंबई: पालघर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर येत्या दोन दिवसांसाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. याबाबत आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जल, जंगल आणि जमीन या महत्त्वाच्या प्रश्नांवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तसेच इतर संघटनांच्या वतीने 19 जानेवारी रोजी भव्य लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. हा लाँग मार्च चारोटी नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर असा काढण्यात येणार असून त्यामध्ये सुमारे 10 ते 11 हजार नागरिक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लाँग मार्चदरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष वाहतूक नियोजन आखले आहे. त्यानुसार 19 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तसेच 20 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पालघर–मुंबई महामार्गावरील काही भागांमध्ये वाहतूक बंद किंवा नियंत्रित ठेवण्यात येणार आहे.
advertisement
हे मार्ग बंद
या कालावधीत जड आणि अवजड वाहनांसाठी विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गुजरात बाजूकडून पालघर, घोडबंदर, ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना अच्छाड नाका येथून प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांना अच्छाड नाका ते आंबोली दरम्यान असलेल्या हॉटेल, धाबे, पेट्रोल पंप तसेच सुरक्षित पार्किंगच्या ठिकाणी थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या वाहनांना महामार्गावर प्रवेश दिला जाणार नाही.
advertisement
हलक्या वाहनांसाठी...
दरम्यान, हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग खुले ठेवण्यात आले आहेत. हलकी वाहने महालक्ष्मी ब्रिज–वाघाडी–कासा–तलवाडा–विक्रमगड–पालफाटा–मनोर या मार्गाने आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतात. तसेच चारोटी नाका–सारणी–निकावली–आंबोली–मसाडा–पेठ–आंबेदा–चिखलीपाडा–नागझरी या पर्यायी मार्गाचाही वापर करता येणार आहे.
लाँग मार्चदरम्यान नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पालघर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 8:57 AM IST








