Mumbai : प्रवास होणार सुपरफास्ट, पॉड टॅक्सीचं तिकीट आता थेट मुंबई वन कार्डवर
Last Updated:
Pod Taxi Ticket On Mumbai One Card In Mumbai : मुंबईतील पॉड टॅक्सी प्रकल्प आता मुंबई वन कार्डशी जोडला जाणार आहे. बीकेसी–कुर्ला मार्गासाठी तिकीट खरेदी एकाच कार्डवरून होणार असून प्रवाशांना मेट्रो, बस, लोकलसोबतच पॉड टॅक्सीचे तिकीटही सहज मिळणार आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने पॉड टॅक्सी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांनी गर्दीतून सुटका मिळणार आहे पण आता या पॉड टॅक्सीबाबत एक नवीन गुड न्यूज समोर आलेली आहे. जी की प्रवाशांना आता या टॅक्सीचे तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा लावण्याची गरज पडणार नाही. नक्की कोणत्या प्रकारे याचे तिकीट काढण्यात येईल त्या बाबत सविस्तर जाणून घेऊयात.
पॉड टॅक्सी प्रकल्प सुरुवातील कुर्ला-वांद्रेमध्ये सुरुवात होणार होती पण आता या पाठोपाठ ही सेवा ठाणे,नवी मुंबई, मीरा-भाईंदरमधील नागरिकांना मिळणार आहे. पॉड टॅक्सी ही चालकविरहित चालवणार असून या टॅक्सीत साधारण 3 ते 6 प्रवासी वाहून नेता येतात.
पॉड टॅक्सीही 'मुंबई वन कार्ड'मध्ये समाविष्ट
मुंबई शहरात लोकल ट्रेन, मेट्रो आणि बस या तिन्ही साधनांचा वापर करुन मुंबई अन् उपनगरातील नागरिक दररोज प्रवास करतात. अनेकदा एका ठिकाणी जाण्यासाठी तिन्ही साधनांचा वापर केला जातो. त्या वेळी नागरिकांना तिकीट काढण्यासाठी जास्त वेळ नको जायला, त्यामुळे 'मुंबई वन कार्ड'ची सुरुवात केली होती. मात्र आता या पाठोपाठ मुंबईत सुरू होणाऱ्या पॉड टॅक्सी प्रकल्पाला आता मुंबई वन कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच या कार्डवरूनही पॉड टॅक्सीचे तिकीट काढता येणार आहे
advertisement
यामुळे भविष्यात पॉड टॅक्सी सेवा सुरू झाल्यावर वेगळे तिकीट काढण्याची गरज भासणार नाही. एकाच कार्डचा वापर करून प्रवाशांना पॉड टॅक्सीचे तिकीटही सहज उपलब्ध होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 8:16 AM IST


