Weather Alert: मराठाड्यात थंडीचा कडाका, छ. संभाजीनगर ते बीड कुठं किती तापमान?

Last Updated:
Weather update: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल जाणवत असून मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला आहे. छत्रपती संभाजीनगरसह आठही जिल्ह्यांतील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यासह मराठवाड्यात थंडीचा जोर अधिकच वाढला आहे. तापमानात मोठी घसरण होत असून धुक्याचे सावटही दिसत आहे. आज शनिवारी मराठवाड्यात सर्वत्र कोरडे वातावरण राहील. तसेच काही ठिकाणी हाडं गोठवणारी थंडी राहण्याची शक्यता आहे. 22 नोव्हेंबर रोजीचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यात आकाश निरभ्र राहणार असून हवेत गारवा अधिक जाणवेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. रात्री अपेक्षेपेक्षा अधिक थंडी जाणवू शकते.

3/5
हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही तापमानात घट कायम राहील. आकाश स्वच्छ असून गारव्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नांदेडमध्ये आज कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान 11 अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याचा अंदाज आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला थंडी अधिक जाणवेल.

4/5
लातूर व धाराशिव जिल्ह्यात दिवसभर कोरडे व निरभ्र वातावरण राहील. ढगांचे प्रमाण कमी असल्याने सकाळ-संध्याकाळच्या वेळेत थंडीचा कडाका अधिक तीव्रतेने जाणवणार आहे. लातूरमध्ये कमाल 30 आणि किमान 14 अंश सेल्सिअस तापमान राहील, असा अंदाज आहे.

5/5
थंडी वाढल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मदत मिळेल; मात्र गारठ्याचा परिणाम लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर होऊ नये म्हणून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता असली तरी मराठवाड्याला कोणताही इशारा नाही.

Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement