advertisement

Maharashtra politics : मोठी बातमी भाजप विधानसभेत भाकरी फिरवणार? 'त्या' आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता

Last Updated:

मोठी बातमी समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीप्रमाणे भाजप काही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाकरी फिरवण्याची शक्यता आहे.

News18
News18
मुंबई, तुषार रुपनवार, प्रतिनिधी : मोठी बातमी समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीप्रमाणे लोकसभेत सुमार कामगिरी झालेल्या मतदारसंघांमध्ये भाजप आता भकरी फिरवण्याची शक्यता आहे. सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे, त्यामुळे भाजपच्या काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
ज्या-ज्या विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये सुमार कामगिरी झाली आहे, तिथे भाजप आता भाकरी फिरवण्याची शक्यता आहे. सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. कामगिरी सुधारली नाही, तर तिकिट कापले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक होणार आहे. फडणवीस हे सध्या विधानसभा मतदारसंघाचा विभागनिहाय आढावा घेत आहेत. मुंबई महानगरनंतर आज आता भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील आमदारांसोबत ते बैठक घेणार आहेत.
advertisement
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं तर दुसरीकडे मात्र महायुतीला मोठा धक्का बसला. महायुतीमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजपकडून खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून  ज्या-ज्या विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये सुमार कामगिरी झाली आहे, तिथे भाजप आता भाकरी फिरवण्याची शक्यता आहे. सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना दोन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. कामगिरी सुधारली नाही, तर तिकिट कापले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra politics : मोठी बातमी भाजप विधानसभेत भाकरी फिरवणार? 'त्या' आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement