– महापालिका निवडणूका झाल्या की त्यांची सावली पण त्यांच्या सोबत राहणार नाही शिवसैनिक तर सोडा
– निवडणूका आल्या की मुंबई तोडणार मराठी माणूस हे मुद्दे येणार, पण हे पाप कोणी केले?
– मी सांगतो कोणी मायका लाल जरी खाली आला तरी मुंबई वेगळी करु शकणार नाही
– आता निवडणूक आल्या की मराठी माणूस आठवतो का?
– मुंबईतील मराछी माणसांकरता आपण रखडलेले प्रकल्प आपण सुरु करतोय
– महाराष्ट्र सर्व क्षेत्रात नंबर वन आहे
– देश आर्थिक महासत्तेकडे चाललाय
– एक ही भ्रष्टाचाराचा आरोप नाही
– बे दाग प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांचा सार्थ अभिमान आहे
– आम्ही दिल्लीला जातो महाराष्ट्राला भरघोस मदत आणण्यासाठी तुमच्या सारखे जनपथ वर मुजरे करायला नाही
– हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार
– या एकनाथ शिंदेंने गिरणी कामगारांना घरे दिली
– १ लाख घरे आम्ही देणार
– RSS वर टीका केली तेच RSS वाले संकटात धावून जातात
– तुम्ही कसले हिंदूत्व वादी
– १०० वर्षे RSS ला झाले त्यांना शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देतो
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live
???? LIVE l 02-10-2025
???? नेस्को एग्झिबिशन सेंटर, मुंबई???? शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा ???? – उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे – लाईव्ह https://t.co/dkGvLFsRbr
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) October 2, 2025
मी आज भाजपला इशारा देतो. हिंदुत्वाच्या मुद्यावरून आमच्या अंगावर येऊ नका, नाहीतर टोप्या घातलेल्या फोटोचं प्रदर्शन लावेन. बटेंगे तो कटेंगे हे कधी करायचं, हे तुमच्या नेत्यांना विचारा. मी पूर्वी बोललोय महाराष्ट्रात गो माता आणि दुसऱ्या राज्यात जाऊन बीफ खातात. आर्यन मिश्रा नावाच्या मुलाचा पाठलाग करून गोळ्या मारल्या, त्यालाा न्याय मिळाला की नााही माहित नाही. किरण रिजूज सांगतात बिफ खातता. आता मी प्रेमाने सांगतोय. प्रत्येकवेळी आगपाखड करायची गरज नाही. तुम्हाला संधी मिळाली आहे. तर त्याचा योग्य वापर करा. आज मला बाळासाहेबांचं व्यंगचित्र आठवतं, जेव्हा जनता पक्ष काढला होता. त्याची आठवण तुम्हाला करून देतोय. मोरारजी देसाई अंधाऱ्या खाईत घेऊन जात आहे. त्याामुळे शिवसेनेची मशाल आपल्याला घेऊन पुढे जायची होती.
२०१४ मध्ये चहाची किती किंमत होती, आता जीएसटी लागू झाल्यावर आता किती किंमत आहे. भ्रष्टाचार पे चर्चा सुरू केली पाहिजे. महााराष्ट्र सरकारला इशारा देतो शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या नाहीत महाराष्ट्र भर आंदोलन करू, मराठवाड्यात मोर्चा काढणार आहोत. एक आंदोलन झालं पाहिजे.
मुंबई पालिकेची निवडणूक होऊनच जाऊ द्या. सगळ्या कामाचं श्रेय ही लोक घेत आहेत. बीडीडी चाळीचं भूमिपूजन मी आणि शरद पवारांनी केली होतं. मुंबईचा कोस्टल रोड आम्ही केलं होतं. आता नाईट लाईफचा निर्णय महायुती सरकार घेत आहे. हे काम आदित्य ठाकरेंनी सुरू केलं होतं. पण भाजपच्या लोकांनी धिंगाणा घातला होता. पण मक्काऊला जाऊन ही लाईटलाईफ नाही. बार आणि पब बंद करा अशी आमची मागणी होती. यांनी तीन वर्षात खाल्लेला पैसे बाहेर येणार आहे. आम्ही सत्तेत आल्यावर व्हाईट पेपर काढणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
यांना सगळ्याच गोष्टीमध्ये उत्सव साजरा करायचा आहे. जीएसटी काय नेहरूंनी लावला होता, आठ वर्ष पैसे खिश्यात घालून बसले आहे. राजेश खन्ना यांचा सिनेमा आठवतोय. हॉटेलवाले त्यांच्याकडे गेले, तिप्पट पैसे वाढवले हे त्या पद्धतीने सुरू आहे.
आत्ता एकाने विचारलं, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का, मग ५ तारखेला आम्ही काय केले होते? आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, त्याचवेळी सांगितले. जिथे मातृभाषेचा घात होतोय, तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही.
जो माणूस क्रिकेटच्या विजयाची तुलना युद्धासोबत करतो तो माणूस बेशरम आहे. क्रिकेट आणि पाकिस्तानसोबत कशासाठी? तुम्ही कशाला ऑपरेशन केलं, तुम्हीच सांगितलं हिंदू आहे हे पाहून गोळ्या झाडल्या. एक तर तुम्ही १० वर्षांपासून सत्तेत बसले आहात, हिंदू सुरक्षित नाही. एकीकडे हिंदुत्वावर बोलायचं आणि तुमचा पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतोय, हीच का तुमची घराणेशाही. एका बाजूला तुमची नासकी घराणेशाही दुसरीकडे आमच्या ठाकरेची घराणेशाही आहे. कशाला घराणेशाहीवर बोलताय.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले- काही जण विचारत आहेत उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? ५ जुलै रोजी काय केले होते. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मनसे सोबतच्या युतीबद्दल सूचक वक्तव्य केले आहे.
भाजप हा अमिबा झाला आहे. हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहे, देशातील लोकप्रिय सीएम कोण आहे. आपलं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्रातील ५ मध्ये आपले सीएम होते. पण हे माझं कर्तृव्य नव्हतं ते तुमचं होतं. आता फडणवीस हे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून १०वे आले आहे. ते येणारच होते, कारण कामाची बजबजपुरी करून टाकली आहे. आजच वसई विरारामध्ये अधिकाऱ्याला अटक केली. अधिकारी बॅगा उघडून ठेवले आहे. मंत्र्यांना बार आणि वाईन शॉपचे पुरावे देत आहे. फडणवीस हे मंत्र्यांना पुरावे आता मिळवून देऊ नका, असं सांगून समजूत काढत आहे.
नेपाळमध्ये जे झालं तसं मोदी सरकारने वांगचूक यांना जेलमध्ये टाकलं आहे. त्यामुळे हा कायदा आपल्या मोडायचा आहे. मोदी सरकारने वांगचूक यांना पाकिस्तानात जाऊन आले असा आरोप केला आहे. त्यांना अटक करून जेलमध्ये टाकलं आहे. मग पंतप्रधान मोदी गुपचूप नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन केक खाल्ला, त्याला काय म्हणायचं. न्याय हक्क मागणे हा देशद्रोह होत आहे.
त्यामुळे या कमलाबाईने चिखल करून ठेवला आहे. सरकार चालवण्याचं यांच सुतराम शक्य नाही.
मणिपूर ३ वर्ष जळत होतं, आता कुठे मोदी तिथे गेले. मोदी तिथे गेले आणि काही तरी तोडगा काढतील. महिलांचं सांत्वन करतील. त्यांचं भाषण आलं हसावं की रडावं असं होतं. मणिपूर के नाममध्ये मनी आहे, ते आम्हाला इथंही कळतं. मणिपूरमध्ये जाऊन मनी दिसलं पण मणिपूरच्या लोकांच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसतं. मग तिथे जाता कशाला.
संघाच्या दसरा मेळावा झाला. त्यांना १०० वर्ष झाली आहे. नेमकी गांधी जयंती आली आहे. हा योगायोग म्हणावा का, जशी संघााला १०० वर्ष झाली आहे. स्वातंत्र्य सेनानी जीजी पारीक यांचं निधन झालं आहे, मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. जो लढेल त्यांना हे सरकार दाबत आहे. या सरकारने जन सुरक्षा कायदा आणला, आपण त्याला विरोध केला.
सगळ्या संघटना जर कडवे डावे, तुम्ही फक्त तोंड देखत नाव सांगत आहे.
सोनम वांगचूक यांनी अत्यंत लेह लडाखमध्ये हाड मोडणाऱ्या थंडीत जवानांसाठी सोलार टेक्लानॉजीवर छावणी बांधून दिली, पाणी मिळावी यासाठी आईस क्यूब आणले; पण न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई सुरू केली करत आहे, उपोषण सुरू केलं, पण सरकार पाहायला तयार नाही. वांगचूक यांनी विरोध करता त्यांना तुरुंगात टाकले.
वंदन बाळासाहेबांना!
वंदन बाळासाहेबांना! pic.twitter.com/VYNRiVxRVm
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 2, 2025
शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली, घरं दारं वाहून गेली. शेतकरी आज विचारतोय काय खायाचं, अशी परिस्थिती आज आली नाही. मराठवाड्यात आपत्तीग्रस्त आहे. संकट खूप मोठं आहे. लातूरला भूकंप झाला होता, तेव्हा आपण गावं दत्तक घेतली होती. आता आपल्याकडे सरकार नाही. पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी तरी द्यावी लागणार आहे. आजचे मुख्यमंत्री आहे त्यांनी तेव्हा मुद्दाम पत्रकार परिषद घेतली होती.
आपलं सरकार होतं तेव्हा हे बोंबलत फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा, पण आता तेच ओला दुष्काळ नाही म्हणत आहे. मी आजही तेच म्हणत आहे, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करा. कोणतेही निकष ठेवू नका. आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही काहीही न पाहता कर्जमाफी केली होती.
दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा, किती वेळा मी बोलायचं ही अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं सोन आयुष्य आहे. अनेक जणांचे आपल्या शिवसेना फोडण्याचे लक्ष आहे, त्यांनी काही जणांना पळवलं ते पितळं होतं, पण सोनं माझ्याकडे आहे. वाघाचं कातडं पांघरलेले कोल्हाची गोष्ट आपण ऐकली असेल, पण गाढवाने वाघाची चादर ओढलेलं मी पहिल्यांदा पाहिला. ते अमित शाह यांचे जोडे उचालणारे आहे, त्यांच्यावर किती आणि काय बोलायचं. हा मेळावा तसाचा घेतला जसा आजपर्यंत होत आहे. हा मेळावा चिखलात घ्यावा लागला. पण कमळाबाईच्या कारभारामुळे झाला आहे. कमळाबाईने जनतेच्या आयुष्याचं वाटोळं केलं आहे.