Sanjay Raut : राज ठाकरे भाजप अन् फडणवीसांची स्क्रीप्ट वाचतात, त्यांच्यावर ईडीची टांगती तलवार, राऊतांचे आरोप

Last Updated:

Sanjay Raut : राज ठाकरे भाजपच्या नादाला लागले असून ते देवेंद्र फडणवीस यांची स्क्रीप्ट वाचतात आणि त्यांच्यावर ईडीची टांगती तलवार असल्याचं विधान शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केलंय.

News18
News18
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केलीय. तसंच राज ठाकरे हे भाजपच्या नादाला लागले असून ते फडणवीसांची स्क्रीप्ट वाचतायत. कारण त्यांच्यावर ईडीची टांगती तलवार आहे असा आरोपही राऊतांनी केला. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज ठाकरे यांच्याबद्दल विचारलं असता राऊतांनी जोरदार निशाणा साधला.
भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय करू शकतो. स्वच्छ शुद्ध तुपातली भाषा कोणासाठी वापरायची? महाराष्ट्रातला शत्रूसाठी आम्ही ही चाटुगिरी आणि चमकीगिरी करणारे लोक नाही आहोत. राज ठाकरे इथे येऊन काय बोलले त्यात मला जायचं नाही. निवडणुका आहेत. भारतीय जनता पक्षाचा स्क्रिप्ट आहे ती. फडणवीस यांच्या स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं नाहीतर ईडीची टांगती तलवार आहे वर अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
advertisement
आम्ही अत्यंत सभ्य सुसंस्कृत माणस आहोत. आम्ही एका परंपरेमध्ये राजकारण केलेले आहे. माझं बरंच आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर गेलं आहे. राज राज ठाकरे यांना देखील माहित आहे. त्याच्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची आणि काय लिहायचं काय बोलायचं याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात राऊतांनी सुनावलं.
ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला राऊत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात गुंडांचा राज्य सुरू झाला आहे त्याच्यावर राज ठाकरे यांनी बोलावं असं आव्हान संजय राऊत यांनी राज ठाकरेंना दिलं.
advertisement
राज ठाकरे ज्या भागात भाषण करून गेले तेथे अंडरवर्ल्ड मदतीने निवडणुका लढवल्या जात आहेत. भाजपकडून आणि एकनाथ शिंदेकडून मुंबईतला अनेक मतदारसंघात ठाणे पुणे अनेक नामचीन गुन्हेगार त्यांचे कधीकाळी अंडरवर्ल्ड टोळ्यांमध्ये सहभाग होता किंवा आहे.अनेक असे गुंड आहेत मी नाव देईन तुम्हाला. त्या गुंडांना जसं आम्ही पक्षातर्फे ऑबजरवर नेमतो अनेक विधानसभा मतदारसंघात संपर्कप्रमुख नेमतो त्या पद्धतीने या गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांवर विधानसभाची जबाबदारी त्यांनी दिलेली आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Sanjay Raut : राज ठाकरे भाजप अन् फडणवीसांची स्क्रीप्ट वाचतात, त्यांच्यावर ईडीची टांगती तलवार, राऊतांचे आरोप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement