Mumbai: कोस्टल रोडवर 'धूम' स्टाईल अपघात, कठडा तोडून कार समुद्रात बुडाली, घटनास्थळाचा VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
गस्तीवर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (MSF) जवानांनी जलद कारवाई केल्याने ही दुर्घटना टळली. त्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढलं.
मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अलीकडे सुरू झालेल्या कोस्टल रोडवर एका कारचा भयानक अपघात झाला आहे. भरधाव कार नियंत्रणाबाहेर गेली आणि समुद्रात कोसळली. कोस्टल रोडवर पुलावर कठडा तोडून ही कार समुद्रात कोसळली. जवळपास ३० फूट कार समुद्रात बुडाली होती. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळीच स्थानिकांनी आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी चालकाला वाचवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरळीजवळील कोस्टल रोडवर मंगळवारी पहाटे ही घटना घडली. मुंबई कोस्टल रोडवर एका चालकाची कार आऊटऑफ कंट्रोल झाली आणि कठडा तोडून समुद्रात कोसळली. ही घटना घडली जेव्हा चालक वळण घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याचं नियंत्रण सुटलं आणि वेगाने जाणारी कार रेलिंगला धडकली आणि सुमारे 30 फूट समुद्रात कोसळली. गस्तीवर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (MSF) जवानांनी जलद कारवाई केल्याने ही दुर्घटना टळली. त्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढलं.
advertisement
Speeding car falls into sea directly from Coastal Road near Worli. Visuals from last night. Car broke through a divider, and plunged 30 feet into the sea. Driver rescued. pic.twitter.com/NeEiEq5Lzq
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) October 7, 2025
advertisement
गाडी समुद्रात बुडाली होती आणि ती बाहेर काढली. पोलिसांना संशय आहे की कार चालक दारूच्या नशेत होता आणि रक्ताचे नमुने चाचणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. कार महालक्ष्मीहून वरळीकडे जात असताना ही घटना घडली. चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, ज्यामुळे ती रेलिंग तोडून सुमारे 30 फूट उंचीवरून समुद्रात पडली.
MSF कर्मचाऱ्यांना कार अपघात झाल्याचे लक्षात आलं आणि त्यांनी गाडीतील प्रवाशाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारून आपला जीव धोक्यात घातला. काही वेळाने त्यांनी कार चालकाला वाचवलं आणि दोरीच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढलं. या घटनेत त्याला किरकोळ दुखापत झाली होती. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि घटनेचा तपास सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 11:30 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: कोस्टल रोडवर 'धूम' स्टाईल अपघात, कठडा तोडून कार समुद्रात बुडाली, घटनास्थळाचा VIDEO