Navi Mumbai : नवी मुंबईत दीडशे मुलांना विषबाधा, विद्यार्थ्यांनी सांगितला अकॅडमीतला धक्कादायक प्रकार
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Navi Mumbai : पनवेलमधील एका नामांकीत अकॅडमीमध्ये मुलांना अन्नपाण्यातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई, (प्रमोद पाटील, प्रतिनिधी) : नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. पनवेलमधील बी. पी. मरीन अकॅडमीमध्ये मुलांना जेवण आणि पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बाधित मुलांवर पनवेल उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवळपास शंभर ते दीडशे मुलांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
पनवेलमधील बी. पी. मरीन अकॅडमीमध्ये अनेक मुलं शिक्षण घेण्यासाठी आहेत. याठिकाणी त्यांनी जेवणही दिलं जातं. अनेक दिवसांपासून जेवण आणि पाणी यासंदर्भात मुलांची तक्रार होती. मात्र, अकॅडमी प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा मुलांचा आरोप आहे. बाहेर कुणालाही सांगण्यास मुलांना मनाई करण्यात आली आहे. ही घटना 12 मार्च रोजी घडली. मात्र, अजूनही मुलांवर उपचार सुरूच आहेत. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचंही उघड होत आहे. यापूर्वीही राज्यात काही ठिकाणी अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे प्रशासन याविरोधात काय पाऊल उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 14, 2024 4:21 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : नवी मुंबईत दीडशे मुलांना विषबाधा, विद्यार्थ्यांनी सांगितला अकॅडमीतला धक्कादायक प्रकार