Mumbai News : महिलांची होणार मोफत आरोग्य तपासणी, मुंबईत 350 शिबिरे, पाहा कधी आणि कुठे?

Last Updated:

केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' या विशेष अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार आणि आवश्यक समुपदेशन सेवा राबवण्यात येणार आहेत.

Mumbai News : महिलांच्या आरोग्यासाठी ३५० तपासणी शिबिरे, दुर्धर आजारांची तज्ज्ञांद्वारे केली जाणार मोफत तपासणी…
Mumbai News : महिलांच्या आरोग्यासाठी ३५० तपासणी शिबिरे, दुर्धर आजारांची तज्ज्ञांद्वारे केली जाणार मोफत तपासणी…
केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' या विशेष अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार आणि आवश्यक समुपदेशन सेवा मुंबईमध्ये राबवण्यात येणार आहेत. 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' यामध्ये मुंबईतील महिलांना शिबिराचा लाभ घेता येणार आहे. शिबिरामध्ये महिलांना ॲनिमिया, तोंड, स्तनाच्या कर्करोगाचे निदान, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि क्षयरोग आदी आजारांची तपासणी करण्यात येणार आहे.
एकूण 350 शिबिरांचे आयोजन संपूर्ण मुंबईमध्ये करण्यात आले आहेत. यामध्ये, 100 शिबिरांमध्ये विशेष तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी आणि उपचार करण्यात येतील. तर, 222 तपासणी आणि जनजागृती शिबिरे आरोग्य केंद्र स्तरावर, 102 विशेष शिबीर प्रसूतिगृहे आणि उपनगरीय रुग्णालये असे एकूण 350 शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य- कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' हे अभियान राबवले जात आहेत. फक्त मुंबईतच नाही तर, संपूर्ण देशभरामध्ये हे अभियान राबवले जात आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित मुंबई महानगर पालिकेने हे अभियान राबवले आहे.
advertisement
मुंबई महानगर पालिकेच्या क्षेत्रात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत अभिनयाला सुरूवात करण्यात आली. अभियानाच्या पहिल्या दिवशी आयोजित शिबिरांच्या 34 ठिकाणी अनेक महिलांनी लाभ घेतला. शिवाय गर्भवती महिलांना पोषण आहार किटचेही वाटप करण्यात आले. 33 आहार तज्ज्ञांकडून शिबिरामध्ये आई, लहान मुलं आणि मुलांच्या पोषणाविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना डॉक्टरांकडून अनेक सरकारी योजनांबद्दलची माहितीही देण्यात आली.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : महिलांची होणार मोफत आरोग्य तपासणी, मुंबईत 350 शिबिरे, पाहा कधी आणि कुठे?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement