व्यवसाय भाजीचा, कमाई 5 लाखांची! मुंबईच्या तरुणाची मेहनत खरोखर प्रेरणादायी
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
रिस्क आणि मेहनत घेण्याची तयारी, या गुणवैशिष्ट्यांच्या जोरावर यशस्वी झालेल्या अनेक व्यावसायिकांची उदाहरणं आहेत. लहानशा गावांमध्येदेखील मोठमोठी स्वप्न उराशी बाळगून व्यावसायिक तयार होतात.
प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : व्यावसायिक होण्यासाठी आवश्यक असते रिस्क आणि मेहनत घेण्याची तयारी. आपल्या याच गुणवैशिष्ट्यांच्या जोरावर यशस्वी झालेल्या अनेक व्यावसायिकांची उदाहरणं आहेत. लहानशा गावांमध्येदेखील मोठमोठी स्वप्न उराशी बाळगून व्यावसायिक तयार होतात.
शैलेंद्र यादव हे मूळ भाजीविक्रेते. पुढे त्यांनी स्वत:चं बॅगेचं दुकान सुरू केलं. या दुकानातून आज ते 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवतात. त्यांच्याकडे लहान मुलांच्या बॅगेपासून कॉलेजसाठीच्या बॅगांचे फॅन्सी कलेक्शन आहेत. ज्यांची किंमत सुरू होते 250 रुपयांपासून.
advertisement
भाजीला बाजारात दररोज मागणी असते, त्यामुळे त्यातून चांगलं उत्पन्न मिळतंच. शैलेंद्र यांची भाजीच्या व्यवसायातून 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत कमाई होते. तर, बॅगेच्या दुकानातून त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे तब्बल 5 लाख रुपये. बॅगांचे फ्रेश कलर आणि युनिक डिझाइन असतात. तर, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात या बॅग मिळतात. त्यामुळे इथं ग्राहक खरेदीसाठी आवर्जून येतात.
advertisement
लहान मुलांसाठी कार्टून बॅगला मोठी मागणी असते. सध्या युनिकॉर्न आणि बार्बी डिझाइनच्या बॅग ट्रेंडिंग आहेत. तसंच विविध कपड्यांवर मॅचिंग बॅगलादेखील मागणी असते. ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी इथं 350 ते 500 रुपयांना दर्जेदार बॅग मिळतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2024 4:55 PM IST

