पुढील 48 तास धो धो कोसळणार, 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील स्थिती
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
कोकणमध्य महाराष्ट्रातील घाटमाथा इथे तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, सातारा पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
मुंबई : राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर हा कायम असणार आहे. कोकणमध्य महाराष्ट्रातील घाटमाथा इथे तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, सातारा पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे. 5 ऑगस्टनंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे. 3 ऑगस्टसाठी साताऱ्याला रेड अलर्ट तर 4 ऑगस्टसाठी सातारा, पुणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पाहूयात पुढील 24 तासांसाठी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
मुंबईत मागील 24 तासात तुरळक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. पुढील 24 तासांसाठी मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस एवढे असेल. तर कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर पालघरला रेड अलर्ट देण्यात आलाय.
advertisement
कोल्हापुरच्या पर्यटन स्थळांच्या यादीतला मुकुटमणी रंकाळा तलाव, पाहा काय आहे वैशिष्ट्य?
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये घाट भागामध्ये अति मुसळधार पावसाचा शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये ही मुसळधार पावसाची शक्यता असून कोल्हापूरला ही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकला ऑरेंज अलर्ट तर जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय.
advertisement
मराठवाड्यात देखील पुढील दोन दिवस हे पावसाचे असणार आहेत. लातूर आणि धाराशिव वगळता 4 ऑगस्टसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असणार आहे.
view commentsLocation :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
August 03, 2024 7:07 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
पुढील 48 तास धो धो कोसळणार, 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील स्थिती

