मुंबईतील 'बोबा टी'ला तरुणाईची पसंती, तरुणाने सुरू केला फूड ट्रक, वर्षाला होतेय इतकी कमाई
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर प्रत्येकाला यश मिळवता येते. प्रत्येकालाच यशाचे शिखर गाठण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हाच संघर्ष आणि इच्छा मनाशी बाळगून मुंबईतील विवेकने त्याचे कॉलेज करत त्याने पाहिलेले फूड ट्रकचे स्वप्न आज पूर्णत्वास आणले आहे.
प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : चहा हे अनेकांच्या आवडीचं पेय. अनेकांना वेळेवर चहा हा लागतोच. त्यात एका तरुणाने अशीच एक आवड जोपासत आपला स्वत:चा व्यवसाय सुरू केला. बोबा टी हे पेय त्याने विकायला सुरुवात केली. विवेक असे या तरुणाचे नाव आहे. विवेकने कॉलेजचे शिक्षण घेता घेता फूड ट्रक सुरू केला आहे. यामधे युथ जनरेशनमध्ये त्याच्या येथील बोबा टी या पेयाची क्रेझ निर्माण झाली आहे. या माध्यमातून तो वर्षाला 5 ते 6 लाख रुपयांची कमाई करत आहे. नेमका त्याचा हा उपक्रम काय आहे, याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर प्रत्येकाला यश मिळवता येते. प्रत्येकालाच यशाचे शिखर गाठण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हाच संघर्ष आणि इच्छा मनाशी बाळगून मुंबईतील विवेकने त्याचे कॉलेज करत त्याने पाहिलेले फूड ट्रकचे स्वप्न आज पूर्णत्वास आणले आहे.
या आहेत मुंबईतील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू, अद्भूत असा इतिहास, photos
मुंबईसारख्या शहरांमध्ये फूड ट्रकची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच असते. यामधे ग्राहकांच्या सेवेत विविध खमंग, चमचमीत, कुरकूरीत, झणझणीत खाद्यपदार्थ मांडणाऱ्या फूड ट्रकची संस्कृती ही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये खवय्यांची गर्दीही मोठया प्रमाणात दिसते. त्यामधे आपणही इतरांपेक्षा काय वेगळे करायचे म्हणून त्याने चहाचा फूड ट्रक सुरू केला. पण ही चहा इतर चहापेक्षा थोडी वेगळी आहे. आतापर्यंत आपण ग्रीन टी, ब्लॅक टी, मिल्क टी, येलो टी, हर्बल टी अशी नावे ऐकली असतील. पण सध्या मार्केटमध्ये एका चहाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
advertisement
बोबा टी असे या चहाचे नाव आहे. या चहाला हे नाव त्याच्यातील घटकांमुळे मिळाले. या चहामध्य बबलही तयार होतो. तसेच हा चहा बनवताना बर्फही टाकला जातो. या चहाचा टेस्ट हा इतर चहांपेक्षा वेगळा असतो. हा चहा बनवताना वेगवेगळ्या फ्लेवरच्या फळांच्या सिरपचा वापर केला जातो.
advertisement
बोबा टी मूळ चीनमध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाते. याच्या फ्लेवरमध्ये आंबा, स्ट्रॉबेरी आणि थाई चहा असे वेगवेगळे फ्लेवर असतात. ही चहा 129 रुपयांपासून सुरू होते. तसेच ती अगदी वेगवेगळ्या फ्लेवरनुसार, अगदी 250 रुपयांपर्यंत मिळते.
कुठे आहे फूड ट्रेक -
view commentsफूड ट्रक मुंबईतील विले पार्ले या ठिकाणी स्थित आहे. येथे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. तरुणाईचा या बोबा टी चहाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या व्यवसायातून आवड असेल तर कोणतही अवघड काम सोपे होते, हेच विवेकने सिद्ध करून दाखवले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 12, 2024 5:44 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईतील 'बोबा टी'ला तरुणाईची पसंती, तरुणाने सुरू केला फूड ट्रक, वर्षाला होतेय इतकी कमाई









