या आहेत मुंबईतील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू, अद्भूत असा इतिहास, photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
मुंबईमध्ये अशा काही वास्तू आहेत, ज्या इंग्रजांच्या काळापासून आहेत. त्यामुळे मुंबईला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. घडाळ्याच्या काटावर सतत धावणाऱ्या या मुंबईमध्ये या सर्व वास्तू पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. याच ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये मुंबईतील ही अत्यंत प्रसिद्ध अशी 8 ठिकाणं आज आपण पाहणार आहोत. (प्रियंका जगताप/मुंबई, प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - इ.स. 1887 मध्ये राणी व्हिक्टोरियाने राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त या स्थानकाची निर्मिती केली होती. प्रथम हे स्थानक व्हिटी अर्थात व्हिक्टोरिया टर्मिनस या नावाने ओळखले जायचे. मात्र, त्यानंतर या स्थानकाचं नामांतरण करण्यात आले. आज हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या नावाने ओळखले जाते. मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंमध्ये या स्थानकाचा प्रथम क्रमांक लागतो.
advertisement
advertisement
राजाबाई टॉवर - मुंबईतील सर्वात चर्चेत राहणारी वास्तू म्हणजे राजाबाई टॉवर. लंडनमधील बिग बेन टॉवरप्रमाणे दिसणारी ही वास्तू ब्रिटीश अभियंता जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली. 1870 मध्ये हे टॉवर उभारण्यात आले. त्याची उंची 230 फूट इतकी आहे. हे टॉवर चर्चगेट स्थानकाजवळी परिसरात आहे.
advertisement
फ्लोरा फाऊंटन/हुतात्मा चौक - मुंबईतील आकर्षण म्हणून ओळखले जाणारे ठिकाण म्हणजे फ्लोरा फाऊंटन. आता हा वास्तू हुतात्मा चौक या नावाने प्रसिद्ध आहे. मुंबईतील फोर्ट विभागातील हा एक चौक असून इ.स. 1864 मध्ये तो तयार करण्यात आला आहे. डेव्हिड ससून यांनी त्यांच्या मरण पावलेल्या फ्लोरा या मुलीच्या स्मणार्थ हे स्मारक तयार केले होते. याच ठिकाणी मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा यासाठी बलिदान देणाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठीदेखील स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे.
advertisement
पॅगोडा - मुंबईपासून किंचित अंतरावर असलेल्या गोराई परिसरात ही वास्तू आहे. सन 2000 साली ही वास्तू उभारण्यात आली. गौतम बुद्धांच्या स्मृतीचिन्हांचा संग्रह आणि जपणूक करण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. ही वास्तू प्रचंड मोठी आहे. त्यामुळे येथे एकाच वेळी 8 हजारांपर्यंत लोक सहज बसू शकतात. तसेच या वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे ती कोणत्याही आधारस्तंभाशिवाय उभी आहे.
advertisement
advertisement
advertisement
माऊंट मेरी चर्च - पोर्तुगालमधील ख्रिस्ती धर्मगुरूंनी 16व्या शतकात मदर मेरीची मूर्ती इथे आणून चर्चची बांधणी केली. ‘बेसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माऊंट’ या नावाने ओळखले जाणारे चर्च पहिल्यांदा 1640 साली बांधले गेले. वांद्रे येथील बँड स्टॅडच्या समुद्रसपाटीपासून अर्धा किलोमीटरवर आणि 80 मीटर उंच टेकडीवरील या चर्चला शेकडो वर्षांचा इतिहास आहे.