25 किन्नरांनी एकाच रूममध्ये उचललं टोकाचं पाऊल, हादरवणारं दृश्य, रुग्णालयात आक्रोश अन् किंकाळ्या!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एकाच वेळी 25 तृतियपंथियांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या 25 जणांनी एकत्र फिनाइलचं सेवन केलं.
इंदूर : मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एकाच वेळी 25 तृतियपंथियांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या 25 जणांनी एकत्र फिनाइलचं सेवन केलं, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
सरकारी महाराजा यशवंतराव रुग्णालयाचे (MYH) प्रभारी अधीक्षक डॉ. बसंत कुमार निंगवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तृतियपंथी समुदायातील सुमारे 25 जणांना आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी एकत्र फिनाइल सेवन केल्याचा दावा केला आहे, पण याची त्वरित पुष्टी करता येत नाही. कोणत्याही रुग्णाची प्रकृती गंभीर नाही', असं निंगवाल यांनी पीटीआयला सांगितलं आहे.
advertisement
तृतियपंथियांनी एकाचवेळी मोठ्या प्रमाणात फिनाइलचं सेवन का केलं? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तपासानंतरच तृतियपंथियांनी नेमका कोणता पदार्थ सेवन केला आणि का केला? हे स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश दंडोटिया यांनी दिली आहे. ही घटना दोन स्थानिक तृतियपंथियांच्या गटामधील संघर्षामुळे झाली असावी, असा संशय दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
advertisement
एक जण ताब्यात
गुरुवारी पोलिसांनी तृतियपंथियांच्या एका गटाच्या नेत्याला ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलिस उपायुक्त राजेश दंडोटिया यांनी सांगितले की, स्थानिक ट्रान्सजेंडर गटाची नेता सपना गुरु हिला पंढरीनाथ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे ताब्यात घेण्यात आले.
अतिरिक्त उपायुक्तांनी सांगितले की, दुसऱ्या ट्रान्सजेंडर गटाच्या सदस्यांचा आरोप आहे की, सपना गुरु आणि तिच्या तीन सहकाऱ्यांनी सामुदायिक परिषदेसाठी जमा केलेली सुरक्षा ठेव परत करण्यास नकार दिला आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
advertisement
या ट्रान्सजेंडर गटाचा असाही आरोप आहे की, सपना गुरु आणि तिच्या सहकाऱ्यांच्या छळाला कंटाळून त्यांच्या 25 सदस्यांनी बुधवारी रात्री आयुष्य संपवण्याच्या उद्देशाने फिनाईल प्राशन केले. ट्रान्सजेंडर समुदायातील गटबाजीबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
अंगावर पेट्रोल ओतलं
बुधवारी रात्री उशिरा एमवायएच कॅम्पसमध्ये झालेल्या गोंधळादरम्यान एका तृतियपंथियाने स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तिचा प्रयत्न हाणून पाडला.
advertisement
दुसऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शहरातील ट्रान्सजेंडर समुदायाच्या दोन गटांमध्ये वर्चस्व, आर्थिक व्यवहार आणि गुरु पदावरून दीर्घकाळापासून वाद सुरू आहे आणि दोन्ही गट नियमितपणे एकमेकांवर गंभीर आरोप करतात आणि कारवाईची मागणी करतात.
view commentsLocation :
Indore,Madhya Pradesh
First Published :
October 16, 2025 11:22 PM IST
मराठी बातम्या/देश/
25 किन्नरांनी एकाच रूममध्ये उचललं टोकाचं पाऊल, हादरवणारं दृश्य, रुग्णालयात आक्रोश अन् किंकाळ्या!