भारतासोबत गद्दारी! ज्योतीनंतर आता प्रियांका, पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात आणखी एका Youtuberला उचललं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ज्योती मल्होत्रानंतर आता पाकिस्तानी गुप्तहेर प्रकरणाची लिंक ओडिसापर्यंत पोहोचली आहे. याप्रकरणी गुप्तचर यंत्रणा आयबीने ओडिशातील प्रियांका सेनापतीला ताब्यात घेतलं आहे.
हरियाणातील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योती 'ट्रॅव्हल विथ जो' नावाचे एक लोकप्रिय YouTube चॅनेल चालवत होती आणि तिचे सुमारे 4 लाख सदस्य (सबस्क्रायबर्स) आहेत. एकीकडे भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असताना आता भारतात राहून पाकिस्तानशी हेरगिरी केल्याचं प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ज्योतीचे पाकिस्तानातील अनेक अधिकाऱ्यांशी वैयक्तिक ओळख होती, अशीही माहिती समोर आली आहे.
ज्योती मल्होत्रानंतर आता पाकिस्तानी गुप्तहेर प्रकरणाची लिंक ओडिसापर्यंत पोहोचली आहे. याप्रकरणी गुप्तचर यंत्रणा आयबीने ओडिशातील प्रियांका सेनापतीला ताब्यात घेतलं आहे. कालपासून तिची अज्ञात स्थळी कसून चौकशी केली जात आहे. हेरगिरी प्रकरणात अटक केलेल्या ज्योती मल्होत्रासोबत तिचे कनेक्शन्स असल्याची माहिती पुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
सध्या वरिष्ठ तपास अधिकारी अज्ञात ठिकाणी प्रियांका सेनापतीची चौकशी करत आहेत. तिचं हेरगिरी करण्यात हात आहे का? तसेच तिचे ज्योती मल्होत्रासोबत कसे संबंध होते, याची पडताळणी केली जात आहे. राज्य आणि केंद्रीय गुप्तचर अधिकारी संयुक्तपणे चौकशी करत आहेत.
advertisement
ज्योती मल्होत्रा पुरीमध्ये किती काळ राहिली? ती कोणत्या ठिकाणी गेली? प्रियांकाचे तिच्याशी किती काळ संबंध होते? तिने कोणते फोटो काढले आणि मंदिराबद्दल तिने काय चर्चा केली? पुरीनंतर ज्योती ओडिशातील इतर कोणत्या ठिकाणी गेली, याबद्दल प्रियांकाकडे चौकशी केली जात आहे. प्रियांका सेनापती देखील एक यूट्यूबर असून तीदेखील सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. ज्योती मल्होत्रानंतर हेरगिरी प्रकरणात तिचंही नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता यात आणखी कुणाचा कनेक्शन समोर येऊ शकतं, याचा तपास पोलीस करत आहेत.
Location :
Bhuwaneshwar,Raigad,Maharashtra
First Published :
May 18, 2025 11:33 AM IST
मराठी बातम्या/देश/
भारतासोबत गद्दारी! ज्योतीनंतर आता प्रियांका, पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात आणखी एका Youtuberला उचललं