Ahmedabad Plane Crash : 133 जणांचा मृत्यू, 242 प्रवाशांमध्ये कोणत्या देशाचे किती नागरिक? एअर इंडियाने दिली लिस्ट
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
एअर इंडियाचं अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान अहमदाबाद विमानतळाजवळ कोसळलं आहे. अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर पुढच्या 10 मिनिटांमध्ये एअर इंडियाचं AI171 हे विमान दुपारी 1 वाजून 38 मिनिटांच्या सुमारास रहिवासी भागामध्ये कोसळलं.
अहमदाबाद : एअर इंडियाचं अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान अहमदाबाद विमानतळाजवळ कोसळलं आहे. अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर पुढच्या 10 मिनिटांमध्ये एअर इंडियाचं AI171 हे विमान दुपारी 1 वाजून 38 मिनिटांच्या सुमारास रहिवासी भागामध्ये कोसळलं. विमानामध्ये एकूण 242 जण होते, यापैकी 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. आतापर्यंत 133 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अहमदाबादहून हे विमान लंडन गेटविकला निघालं होतं. विमानामध्ये असलेल्या 230 प्रवाशांपैकी 169 प्रवासी हे भारतीय तर 53 ब्रिटीश नागरिक, 7 पोर्तुगिस आणि 1 कॅनडाचा नागरिक होता, तसंच दोन लहान मुलंही या विमानातून प्रवास करत होती. या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी असल्याची माहितीही समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळे हे विमान मागच्या 2 दिवसांपासून अहमदाबादमध्येच होतं.
advertisement
रहिवासी भागाचंही नुकसान
अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर हे विमान रहिवासी भागातल्या एका हॉस्पिटलवर जाऊन कोसळलं, त्यामुळे रुग्णालयातील 10 ते 12 डॉक्टरही जखमी झाले आहेत. विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणी एक सरकारी रुग्णालय होते. या सरकारी रुग्णालयाच्या टीबी विभागावर हे विमान कोसळले, तिथे जेवणाची मेस देखील होती.
विमान कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्याला सुरूवात करण्यात आली. तसंच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Location :
Ahmedabad,Gujarat
First Published :
June 12, 2025 4:37 PM IST
मराठी बातम्या/देश/
Ahmedabad Plane Crash : 133 जणांचा मृत्यू, 242 प्रवाशांमध्ये कोणत्या देशाचे किती नागरिक? एअर इंडियाने दिली लिस्ट