Ahmadabad Plane Crash: विमान कोसळतानाचा LIVE VIDEO, शेवटची 10 सेकंद कॅमेऱ्यात कैद

Last Updated:

Ahmadabad Plane Crash Live Video: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळल्याची माहिती मिळत आहे.

News18
News18
Ahmadabad Plane Crash Live Video: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी अपघात घडला, त्यावेळी विमानातून तब्बल २४२ प्रवासी प्रवास करत होते. हे विमान एअर इंडियाचं असल्याची माहिती मिळाली आहे. हे विमान अहमदाबादवरून लंडनच्या दिशेनं जात होतं. मात्र टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या दहाच मिनिटांत हा अपघात घडला.
हा अपघात इतका भीषण होता, ही विमानाचे अक्षरश: चिंधड्या उडाल्या आहेत. विमानाचे काही भाग आसपास असलेल्या इमारतीवर जाऊन पडले आहेत. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसत आहेत. अपघाताची घटना घडताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाचे जवळपास २२ सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे.
advertisement
या व्हिडीओत एअर इंडियाचं विमान अकाशात झेपावताना दिसत आहे. विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात या विमानाचा अपघात झाला आहे. कोणतीही हेलकावे न खाता हे विमान क्रॅश झालं आहे. विमान जमीनीवर कोसळल्यानंतर पुढच्याच सेकंदा आगीचा भडका उडाल्याचं दिसत आहे. त्यामुळे मोठी जिवीतहानी झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
advertisement
हा अपघात इतका भयंकर होता की विमानाचे काही भाग आसपासच्या परिसरात जाऊन पडले. काही भाग जवळच्या इमारतीवर देखील जाऊन कोसळले आहेत. एअर इंडियाचं AI171 हे विमान अहमदाबादवरून लंडनच्या दिशेनं जात होतं. यावेळी विमानात एकूण २३२ प्रवासी आणि १० केबिन क्रूचा समावेश आहे. यात दोन नवजात बालकं देखील होती.
एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाचा अपघात
advertisement
अपघाती विमानात २४२ प्रवासी असल्याची माहिती
टेक ऑफच्या 5 मिनिटानंतरच विमान खाली कोसळलं
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमान कोसळलं
विमान अपघातामुळे परिसरातील इमारतीही कोसळल्या
अहमदाबाद प्रवासी विमानचा भीषण अपघात
अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची भीती
विमान दुर्घटनेनंतर अहमदाबाद विमानतळावर धावपळ
अपघातात अनेक प्रवाशांच्या मृत्यू झाल्याचं भीती
सरदार वल्लभभाई पटेल विमातळावरची घटना
advertisement
रहिवासी परिसरात विमान कोसळलं
मराठी बातम्या/देश/
Ahmadabad Plane Crash: विमान कोसळतानाचा LIVE VIDEO, शेवटची 10 सेकंद कॅमेऱ्यात कैद
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement