Air India Plane Crash: लेकरं लंडनमध्ये, पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करायला आला अन्.., वाटेतच नियतीचा क्रूर खेळ

Last Updated:

Air India Plane Crash: अर्जुनभाई हे आपल्या दोन मुलांना लंडनमध्ये सोडून पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले होते.

News18
News18
अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाचं विमान कोसळलं. हे विमान अहमदाबादवरून इंग्लंडला जात होतं. पण टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतचं विमानाचा अपघात झाला. ज्यावेळी अपघात घडला, त्यावेळी विमानातून एकूण २४२ लोक प्रवास करत होते. यात १० कॅबिन क्रू सदस्यांचा समावेश होता. या विमान अपघातातून एकमेव प्रवासी बचावला आहे. ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं, त्या इमारतीतील काही लोकांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे एअर इंडिया विमान अपघातातील मृतांचा आकडा आता २६५ वर गेला आहे.
या विमान अपघातात अर्जुनभाई मनुभाई पाटोलिया यांचाही मृत्यू झाला आहे. अर्जुनभाई हे आपल्या दोन मुलांना लंडनमध्ये सोडून पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले होते. त्यांनी आपल्या पत्नीची शेवटची इच्छाही पूर्ण केली. मात्र पुन्हा आपल्या मुलांकडे लंडनला जात असताना अर्जुनभाई यांचा वाटेतच मृत्यू झाला. या विमान अपघातात जे २४१ जण मृत पावले त्यात अर्जुनभाई पाटोलिया यांचाही समावेश होता. अर्जुनभाई यांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement

लेकरं लंडनमध्ये अडकली, बापाचा विमान अपघातात मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनभाई पाटोलिया हे मूळचे गुजरातमधील वाडीया येथील रहिवासी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते लंडनमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये त्यांच्या पत्नीचं निधन झालं. आपल्यावर मायदेशात अत्यंसंस्कार व्हावेत, अशी अर्जुनभाईंच्या पत्नीची इच्छा होती. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुनभाई आपल्या दोन मुलांना लंडनमध्ये सोडून भारतात आले होते. त्यांनी पत्नीच्या इच्छेनुसार, तिच्यावर अंत्यसंस्कारही केले.
advertisement
पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. गुरुवारी १२ जूनला झालेल्या विमान अपघातात अर्जुनभाईंचा मृत्यू झाला. या निधनामुळे वाडीयामध्ये शोककळा पसरली आहे. शोकाकुल नातेवाइकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आठवणींचा ओझं घेऊन आणि कर्तव्य पार पाडून ते आपल्या मुलांकडे परतण्यासाठी १२ जून २०२५ रोजी एअर इंडिया फ्लाइट AI171 मध्ये बसले, पण नियतीने क्रूर खेळ केला.
मराठी बातम्या/देश/
Air India Plane Crash: लेकरं लंडनमध्ये, पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करायला आला अन्.., वाटेतच नियतीचा क्रूर खेळ
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement