Air India Plane Crash : टेकऑफ ते क्रॅश... त्या 31 सेकंदांमध्ये काय घडलं? विमान अपघाताचा धक्कादायक CCTV
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. एअर इंडियाचं हे विमान 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सना घेऊन जात होतं, या 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. एअर इंडियाचं हे विमान 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सना घेऊन जात होतं, या 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी लंडनसाठी टेकऑफ केलं, पण पुढच्या काही सेकंदांमध्ये विमान कोसळलं.
अहमदाबाद विमान अपघाताचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे. या सीसीटीव्हीमध्ये विमानाने टेकऑफ केल्यानंतर पुढच्या 31 सेकंदांमध्ये ते कोसळत असल्याचं दिसत आहे. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाल्याचं तसंच आगीचे लोट आणि धूर येत असल्याचंही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
advertisement
अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर पुढच्या काही क्षणांमध्ये हे विमान एअर इंडियाचं AI171 हे विमान दुपारी 1 वाजून 38 मिनिटांच्या सुमारास कोसळलं. अहमदाबादहून हे विमान लंडन गेटविकला निघालं होतं. विमानामध्ये असलेल्या 230 प्रवाशांपैकी 169 प्रवासी हे भारतीय तर 53 ब्रिटीश नागरिक, 7 पोर्तुगिस आणि 1 कॅनडाचा नागरिक होता, तसंच दोन लहान मुलंही या विमानातून प्रवास करत होती. या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानीही होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळे हे विमान मागच्या 2 दिवसांपासून अहमदाबादमध्येच होतं.
advertisement
अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर हे विमान रहिवासी भागातल्या एका हॉस्पिटलवर जाऊन कोसळलं, त्यामुळे रुग्णालयातील काही डॉक्टरही जखमी झाले आहेत. विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणी एक सरकारी रुग्णालय होते. या सरकारी रुग्णालयाच्या टीबी विभागावर हे विमान कोसळले, तिथे जेवणाची मेस देखील होती.
Location :
Ahmedabad,Gujarat
First Published :
June 12, 2025 8:04 PM IST
मराठी बातम्या/देश/
Air India Plane Crash : टेकऑफ ते क्रॅश... त्या 31 सेकंदांमध्ये काय घडलं? विमान अपघाताचा धक्कादायक CCTV