विमान दुर्घटनेनंतर अहमदाबादला जाणाऱ्या विमानांचं काय होणार? समोर आली मोठी अपडेट

Last Updated:

पुढील आदेशापर्यंत कोणतेही उड्डाण होणार नाही. प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांकडून अपडेट माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

News18
News18
अहमदाबादहून लंडनला जाणारे फ्लाईट एआय 171 आज सकाळी टेकऑफ झाल्यानंतर लगेचच विमानतळाबाहेर कोसळले. या अपघातामुळे अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. या विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी ग्रुपकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ प्रशासनाने सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत.
पुढील आदेशापर्यंत कोणतेही उड्डाण होणार नाही. प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांकडून अपडेट माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भीषण अपघातात 133 प्रवासी मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक पावले उचलली आहेत आणि प्रवाशांना सहकार्य आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही नवीन अपडेट मिळताच, ती त्वरित शेअर केली जाईल असंही सांगितलं जात आहे.
advertisement
एन. चंद्रशेखरन काय म्हणाले, अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे फ्लाइट 171 आज एका दुःखद अपघातात सापडले याची मी पुष्टी करतो. या अत्यंत हृदयद्रावक घटनेत बाधित झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना आमच्या संवेदना आणि प्रार्थना आहेत.
या वेळी आमचे सर्वोच्च प्राधान्य म्हणजे बाधित प्रवाशांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणे. गरजूंना त्वरित मदत करण्यासाठी आमचे पथक घटनास्थळी उपस्थित असलेल्या मदत संस्थांसोबत पूर्ण ताकदीने काम करत आहेत. आम्ही एक आपत्कालीन केंद्र सक्रिय केले आहे आणि बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी एक विशेष मदत पथक देखील तयार केले आहे.
मराठी बातम्या/देश/
विमान दुर्घटनेनंतर अहमदाबादला जाणाऱ्या विमानांचं काय होणार? समोर आली मोठी अपडेट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement