प्लेन क्रॅशआधीचा खळबळजनक Video, खटकणारे फ्लॅप्स, ढग नसतानाही टर्ब्युलन्स, प्रवाशाला आधीच आला अंदाज!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी अहमदाबादच्या विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर विमान पुढच्या 10 मिनिटांमध्ये रहिवासी भागात कोसळलं.
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी अहमदाबादच्या विमानतळावरून टेक ऑफ केल्यानंतर विमान पुढच्या 10 मिनिटांमध्ये रहिवासी भागात कोसळलं. या विमान अपघातानंतर आकाश वत्स या प्रवाशाने काही धक्कादायक आरोप केले आहेत. आपण या विमानातून दिल्लीहून अहमदाबादला आलो आणि हेच विमान अहमदाबादहून पुढे लंडनला निघालं. या विमानात आपल्याला काही खटकणाऱ्या गोष्टी आढळल्या, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो आपण काढल्याचं आकाश वत्स यांनी सांगितलं आहे. सोशल मीडियावर आकाश वत्स यांनी हे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
'मी अपघाताच्या एक दीड तासापूर्वीच विमानातून उतरलो होतो. मी दिल्लीहून अहमदाबादला आलो. मी, माझे वडील आणि माझा मित्र या विमानात होतो. विमानात काही खटकणाऱ्या गोष्टी मला जाणवल्या. मला एव्हिएशन क्षेत्रातील माहिती आहे. विमानातील एसी नीट चालत नव्हता. टेक ऑफनंतरही कॉमप्रेसर ऑन ऑफ होत होता. लोक मॅगझिनने स्वत:ला वारा घालत होते. टेक ऑफ आणि लॅन्डिंगच्या वेळी मी डाव्या बाजूला इंजिनच्या इकडे बसलो होतो, त्याचे फ्लॅप्स पाहूनही मला काही गोष्टी खटकल्या. मी त्याचे फोटो आणि त्याचे व्हिडिओही काढले', असं आकाश वत्स म्हणाला आहे.
advertisement
I was in the same damn flight 2 hours before it took off from AMD. I came in this from DEL-AMD. Noticed unusual things in the place.Made a video to tweet to @airindia i would want to give more details. Please contact me. @flyingbeast320 @aajtak @ndtv @Boeing_In #planecrash #AI171 pic.twitter.com/TymtFSFqJo
— Akash Vatsa (@akku92) June 12, 2025
advertisement
'फ्लाईटच्या कॅप्टनने घोषणा केली, की अहमदाबादमधील वातावरण चांगलं आहे, पण लॅण्डिंगच्या शेवटच्या टप्प्यात टर्ब्युलन्स होईल. वातावरण चांगलं असेल तर लॅण्डिंगच्या शेवटच्या टप्प्यात कोणता टर्ब्युलन्स येतो? कोणतेही ढग नाहीत, वातावरण चांगलं होतं, उन्ह पडलं होतं, मग टर्ब्युलन्स कसा येऊ शकतो? हे मला समजलं नाही', अशी प्रतिक्रिया आकाश वत्स याने दिली आहे.
advertisement
विमान प्रवाशांनी भरलेलं होतं. 10 वाजून 7 मिनिटांनी आमच्या विमानाने दिल्लीहून टेक ऑफ केलं होतं. 11 वाजून 15 मिनिटांनी आम्ही अहमदाबादमध्ये लॅण्ड केलं, अशी माहिती आकाश वत्स यांनी दिली आहे.
Location :
Ahmedabad,Gujarat
First Published :
June 12, 2025 6:24 PM IST
मराठी बातम्या/देश/
प्लेन क्रॅशआधीचा खळबळजनक Video, खटकणारे फ्लॅप्स, ढग नसतानाही टर्ब्युलन्स, प्रवाशाला आधीच आला अंदाज!