Air India Plane Crash: एअर इंडियाचं विमान हॉस्पिटच्या मेसवर कोसळलं, 15 डॉक्टर गंभीर जखमी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानामधून 242 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे.
Air India Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये सर्वात मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचं AI - 171 हे प्रवासी विमान कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. टेकऑफनंतर विमान कोसळल्यानं ही मोठी दुर्घटना घडलीय या घटनेनंतर काही क्षणातच अग्निशमनदलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. हे विमान एका रुग्णालयावर कोसळले असून यामध्ये काही डॉक्टर देखील जखमी झाले आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानामधून 242 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणी एक सरकारी रुग्णालय होते. या सरकारी रुग्णालयाच्या टीबी विभागावर विमान कोसळले. तिथे जेवणाची मेस देखील होते. तसेच रुग्णालयात १० ते १५ डॉक्टर देखील होते. ते देखील जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू भीती
अपघातात आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश आणि ७ पोर्तुगीज होते. विमानात ११ लहान मुले देखील होती.अपघातानंतर अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. असे सांगितले जात आहे की विमान जिथे कोसळले ते मेघानी नगर हे निवासी क्षेत्र आहे आणि अशा परिस्थितीत जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. विमानतळापासून मेघानी नगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
advertisement
कसा झाला विमान अपघात?
- अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान कोसळलं
- एअर इंडियाचं AI-171 विमान
- दुपारी 1.17 वाजता विमानाचं टेक ऑफ
- दुपारी 1.27 वाजता विमान कोसळलं
- टेकऑफच्या 10 मिनिटांनंतरच विमान कोसळलं
- अपघातग्रस्त विमानात 242 प्रवासी होते
- रहिवासी भागात विमान कोसळलं
- मेघानीनगर परिसरात विमान अपघातग्रस्त
- विमानतळापासून मेघानीनगर परिसर 16 किमी अंतरावर
- विमानातील इंधन टँक फुल असल्याने मोठ्या हानीची शक्यता
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 12, 2025 3:33 PM IST
मराठी बातम्या/देश/
Air India Plane Crash: एअर इंडियाचं विमान हॉस्पिटच्या मेसवर कोसळलं, 15 डॉक्टर गंभीर जखमी