advertisement

विवाहित पुरुषाचे 'लिव्ह-इन रिलेशनशिप' आता कायदेशीर? हायकोर्टाच्या खळबळजनक निकालाची देशभरात चर्चा, एका वाक्याने अख्खं प्रकरण फिरलं

Last Updated:

Live-in Relationship: अलाहाबाद उच्च न्यायालयने स्पष्ट केलं की प्रौढ व्यक्तींमधील परस्पर संमतीने असलेले लिव्ह-इन नाते गुन्हा ठरत नाही. विवाहित पुरुषाने अशा नात्यात राहिल्यामुळे त्याच्यावर कारवाई करता येणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने दिला.

News18
News18
अलाहाबाद: अलाहाबाद उच्च न्यायालयने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय देत म्हटले की एखादा विवाहित पुरुष प्रौढ महिलेसोबत परस्पर संमतीने (consensual) लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करता येणार नाही. हा खटला उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथील एका जोडप्याने दाखल केलेल्या फौजदारी रिट याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला.
न्यायालयाने ‘नैतिकता’ (morality) आणि ‘कायदा’ (law) यामधील स्पष्ट फरक अधोरेखित केला. न्यायालयाच्या मते या प्रकरणात प्रथमदर्शनी (prima facie) कोणताही गुन्हा झाल्याचे दिसत नाही.
न्यायालयाने असेही नमूद केले की नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करताना सामाजिक मत किंवा नैतिकतेच्या आधारावर निर्णय घेता येत नाही. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना या जोडप्याला अटक न करण्याचे निर्देश दिले. याशिवाय महिला याचिकाकर्त्याच्या कुटुंबीयांनी या जोडप्याला कोणतीही हानी पोहोचवू नये, यासाठी संयम बाळगण्याचे आवाहनही केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिल रोजी होणार आहे.
advertisement
प्रकरण नेमके काय आहे?
ही याचिका अनामिका आणि नेत्रपाल या जोडप्याने दाखल केली होती. 8 जानेवारी 2026 रोजी अनामिकाच्या आई कांती यांनी शाहजहानपूरमधील जैतीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी आरोप केला की नेत्रपालने त्यांच्या मुलीला फूस लावून (entice) तिच्यासोबत घराबाहेर नेले. तसेच धर्मपाल नावाच्या आणखी एका व्यक्तीने त्याला मदत केल्याचा दावा करण्यात आला.
advertisement
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 87 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर या जोडप्याने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आणि संरक्षणाची मागणी केली.
न्यायालयात काय मांडण्यात आले?
याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सांगितले की ते दोघेही प्रौढ आहेत आणि सध्या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. दुसरीकडे अनामिकाच्या आईच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, नेत्रपाल हा विवाहित आहे. त्यामुळे दुसऱ्या महिलेसोबत राहणे हा गुन्हा ठरतो.
advertisement
कोर्टाचे मत
सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि स्पष्ट केले की नेत्रपालवर कोणत्याही गुन्ह्याखाली कारवाई करता येणार नाही. यामुळे प्रौढ व्यक्तींमधील परस्पर संमतीने असलेले लिव्ह-इन नाते हे गुन्हा नसल्याचे न्यायालयाने पुन्हा एकदा अधोरेखित केले.
view comments
मराठी बातम्या/देश/
विवाहित पुरुषाचे 'लिव्ह-इन रिलेशनशिप' आता कायदेशीर? हायकोर्टाच्या खळबळजनक निकालाची देशभरात चर्चा, एका वाक्याने अख्खं प्रकरण फिरलं
Next Article
Rohit Sharma VIDEO :  4 कोटीच्या कारवर रागात बुक्की, ड्रायव्हरवर चिडला, रोहित शर्माला नेमकं काय झालं?
VIDEO : 4 कोटीच्या कारवर रागात बुक्की, ड्रायव्हरवर चिडला, रोहित शर्माला नेमकं काय झालं?
View All
advertisement