IND VS PAK: भारत सरकारचा दहशतवाद्यांबद्दल महत्त्वाचा निर्णय, पाकिस्तानला मोठा धक्का
- Published by:sachin Salve
Last Updated:
भारतीय सैन्याने पाकचे सर्व नापाक हल्ले परतावून लावले आहे. अशातच आता दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला भारताने दणका दिला आहे.
दिल्ली : भारताच्या सीमारेषेवर उघडपणे शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानने मागील ३ दिवसांपासून ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू केले आहे. भारतीय सैन्याने पाकचे सर्व नापाक हल्ले परतावून लावले आहे. अशातच आता दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला भारताने दणका दिला आहे. यापुढे भारतात कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर तो अॅक्ट ऑफ वॉर समजला जाईल, असा निर्णय भारत सरकारने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
भारताने आता दहशतवादाविरोधात आपली भूमिका अधिक कठोर केली आहे. सीमारेषेवर पाकिस्तानचे ज्या प्रकारे हल्ले सुरू आहे. आता भारतात कुठेही दहशतवादी हल्ला झाला तर तो "भारताविरुद्ध युद्ध" मानला जाईल आणि त्याला तसाच प्रत्युत्तर दिलं जाईल, असं निर्णय भारत सरकारने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेला मिळालेल्या गंभीर आव्हानांनंतर घेतल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. ही भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावरही मजबूत संदेश देणारी आहे की भारत आपल्याविरुद्धच्या दहशतवादी कारवाया खपवून घेणार नाही, असं भारताने ठणकावून सांगितलं.
Location :
Delhi,Delhi
First Published :
May 10, 2025 4:28 PM IST
मराठी बातम्या/देश/
IND VS PAK: भारत सरकारचा दहशतवाद्यांबद्दल महत्त्वाचा निर्णय, पाकिस्तानला मोठा धक्का