Atishi : आतिशी होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, आप आमदारांच्या बैठकीत निर्णय
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
आमदारांच्या बैठकीत केजरीवाल यांच्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले.
दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीन राजीनामा देणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी केली. यानंतर आज आमदारांच्या बैठकीत केजरीवाल यांच्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले. आपच्या आमदार आतिशी यांच्या नावावर एकमत झाले असून आता त्या मुख्यमंत्री होणार आहेत.
दारू धोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर सीबीआयकडून त्यांची चौकशी झाली. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर आले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नव्हता. पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पक्षाच्या मेळाव्यात बोलताना आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती.
advertisement
अरविंद केजरीवाल यांच्यानंतर मुख्यमंत्री कोण? याची उत्सुकता सर्वांना होती. यामध्ये सहा जणांची नावे शर्यतीत होती. यात आतिशी, सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गेहलोत, कुलदीप कुमार, राखी बिर्ला यांची नावं आघाडीवर होती. यात आतिशी यांनी बाजी मारली असून मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.
आतिशी यांना केजरीवाल यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. त्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून संघटनेत सक्रीय आहेत. यावेळी त्यांच्याकडे सर्वाधिक मंत्रालयांची जबाबदारी होती. मार्च महिन्यात केजरीवाल जेव्हा तुरुंगात गेले तेव्हापासून सरकारमध्ये त्यांनी सर्व जबाबदारी सांभाळली होती.
advertisement
दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारीत होणार आहे. पण ही निवडणूक महाराष्ट्रासोबतच घ्यावी अशी मागणी अरविंद केजरीव यांनी केली होती. निवडणूक होणार नाही तोपर्यंत आपकडून दुसऱ्या नेत्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवू असं केजरीवाल म्हणाले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2024 11:46 AM IST