Bihar Exit Poll Result: नितीश कुमारांची शांतीत क्रांती! बिहारमध्ये अब की बार NDA सरकार, एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Last Updated:

Bihar Exit Poll Result: प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला (JSP) पहिल्या टप्प्यात कोणताही ठसा उमटवता आलेला नाही.

News18
News18
Bihar Assembly Election Update : बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानुसार, बिहारमध्ये 243 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी 6 नोव्हेंबर रोजी मतदान झालं. त्यामध्ये 64.66 टक्के मतदारांना मतदानाचा हक्क बजावला आहे. News 18 च्या पोलचे पहिल्या टप्प्याचे आकडे हाती आले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)ने आघाडी घेतल्याचं चित्र समोर आलं आहे. एक्झिट पोल अंदाजानुसार एनडीएला 60 ते 70 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर महागठबंधन (MGB) 45 ते 55 जागा मिळतील, असा अंदाज आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला (JSP) पहिल्या टप्प्यात कोणताही ठसा उमटवता आलेला नाही.
पहिल्या टप्प्याचे हाती आलेल्या अंदाजानुसार नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) चा करिश्मा पाहायला मिळाला आहे. जेडीयूला या टप्प्यात 35 ते 45 जागा मिळू शकतात. 2020 मध्ये या भागात त्यांना फक्त 23 जागा मिळाल्या होत्या. 2020 मध्ये एलजेपीने (रामविलास पासवान गट) उमेदवार उभे करून जेडीयूला मोठा धक्का दिला होता. मात्र, या वेळी एलजेपीच्या भूमिकेमुळे गोंधळ नसल्याने एनडीएचे मत एकत्र आले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो.
advertisement
जेडीयूला अतिदुर्बल घटक (EBC), कुशल कामगार, लघुउद्योग व्यापारी वर्ग यांचं मोठं समर्थन मिळाल्याचं दिसतं आहे.तर भाजपने 48 जागांवर उमेदवार उभे केले असून त्यांना 20 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शहरी मतदार, सवर्ण समाज, आणि महिला मतदारांमध्ये भाजपचं मजबूत समर्थन कायम आहे.
आरजेडीला फटका, महागठबंधन पिछाडीवर
तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला (RJD) या टप्प्यात फटका बसलेला दिसतो.2020 मध्ये 121 पैकी 42 जागा जिंकणाऱ्या आरजेडीला यंदा 25 ते 35 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. रोजगाराच्या आश्वासनामुळे तरुण मतदार आणि ओबीसी मतदार आरजेडीकडे झुकले असले तरी, ग्रामीण भागात जेडीयूने गमावलेली मते परत मिळवली, असं दिसतं आहे.
advertisement
काँग्रेसने या टप्प्यात 24 जागांवर उमेदवार दिले असून त्यांना 5 ते 10 जागा मिळू शकतात. बहुतांश काँग्रेसच्या मजबूत जागा दुसऱ्या टप्प्यात आहेत. डाव्या पक्षांची (CPI-ML, CPI, CPM) मात्र स्थिर किंवा थोडी वाढ होण्याची शक्यता असून त्यांना 10 ते 15 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
जनसुराज्य पक्षाचा करिश्मा नाही चालला
प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाने (JSP) पहिल्या टप्प्यात तब्बल 118 जागांवर उमेदवार उभे केले, परंतु एकाही जागेवर प्रभाव पडलेला नाही. नवीन पक्ष म्हणून मिळालेलं लक्ष मतदानात रूपांतरित करण्यात JSPला यश आलेलं दिसत नाही.
advertisement
मतदारांचा कल – वेगवेगळे आधारगट
पहिल्या टप्प्यातील आकडेवारीनुसार बिहारमध्ये मतदारांचा कल सामाजिक आणि आर्थिक स्तरांनुसार स्पष्ट विभागलेला दिसतो:
शहरी मतदार, उच्चशिक्षित वर्ग: भाजप, काँग्रेस
ग्रामीण मतदार, ईबीसी समुदाय: जेडीयू
ओबीसी आणि तरुण मतदार: आरजेडी
शेतमजूर, गैर-कृषी कामगार: आरजेडी, काँग्रेस
व्यवसायिक, कुशल कामगार: जेडीयू
महिला मतदार: भाजपकडे झुकलेले
जमीनधारक वर्ग: भाजप समर्थक
view comments
मराठी बातम्या/देश/
Bihar Exit Poll Result: नितीश कुमारांची शांतीत क्रांती! बिहारमध्ये अब की बार NDA सरकार, एक्झिट पोलची आकडेवारी समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement