दाजी मेहुणीला घेऊन पळाला, दुसऱ्या दिवशी मेहुण्याने बदला घेतला, त्याच्याच बहिणीला घेऊन फरार झाला!

Last Updated:

एखाद्या टीव्ही सीरियललाही लाजवेल अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. एक व्यक्ती आपल्या मेहुणीला घेऊन पळाला, यानंतर दुसऱ्याच दिवशी मेहुण्याने बदला घेतला.

दाजी मेहुणीला घेऊन पळाला, दुसऱ्या दिवशी मेहुण्याने बदला घेतला, त्याच्याच बहिणीला घेऊन फरार झाला! (AI Image)
दाजी मेहुणीला घेऊन पळाला, दुसऱ्या दिवशी मेहुण्याने बदला घेतला, त्याच्याच बहिणीला घेऊन फरार झाला! (AI Image)
एखाद्या टीव्ही सीरियललाही लाजवेल अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. एक व्यक्ती आपल्या मेहुणीला घेऊन पळाला, यानंतर दुसऱ्याच दिवशी मेहुण्याने असा बदला घेतला, ज्याची गावात चर्चा सुरू आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये मंगळवारी आपसामध्ये तडजोड झाल्यामुळे पोलिसांनी कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही.
6 वर्षांपूर्वी लग्न झालेला आणि दोन मुलांचा बाप असलेला केशव कुमार (वय 28) हा 23 ऑगस्टला त्याच्या 19 वर्षांची मेहुणी कल्पनासोबत घर सोडून पळाला. याच्या एक दिवसानंतर केशवच्या पत्नीचा भाऊ रवींद्र (वय 22) हा केशवची 19 वर्षीय बहिणीसोबत घरातून पळून गेला. लागोपाठ दोन दिवस घडलेल्या या घटनेमुळे कुटुंब धक्क्यात गेलं, यानंतर त्यांनी बरेली जिल्ह्यातील नवाबगंज पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
advertisement
नवाबगंजचे एसएचओ अरुण कुमार श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी 14 आणि 15 सप्टेंबर ला दोन्ही जोडप्यांना शोधून काढलं. यानंतर दोन्ही कुटुंबांना पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं. पोलिसांसमोरच कुटुंबाने तडजोड केली, ज्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांनीही हे प्रकरण बंद केलं असलं, तरी या अनोख्या लव्ह स्टोरीची गावभर चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या/देश/
दाजी मेहुणीला घेऊन पळाला, दुसऱ्या दिवशी मेहुण्याने बदला घेतला, त्याच्याच बहिणीला घेऊन फरार झाला!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement