advertisement

उलटी माघारी श्वासनलिकेत गेल्यामुळे BSF जवानाचा मृत्यू, नेमकी काय झाली चूक?

Last Updated:

कधी कोणतं संकट येईल सांगू शकत नाही. तसंच कधी मृत्यूचा योग असेल हेदेखील कोणी सांगू शकत नाही. सध्या एक धक्कादायक घटना समोर आलीय, ज्यामध्ये एका बीएसएफ जवानाचा उलटीमुळे मृत्यू झाला.

उलटी माघारी श्वासनलिकेत गेल्यामुळे BSF जवानाचा मृत्यू
उलटी माघारी श्वासनलिकेत गेल्यामुळे BSF जवानाचा मृत्यू
नवी दिल्ली, 19 डिसेंबर : कधी कोणतं संकट येईल सांगू शकत नाही. तसंच कधी मृत्यूचा योग असेल हेदेखील कोणी सांगू शकत नाही. सध्या एक धक्कादायक घटना समोर आलीय, ज्यामध्ये एका बीएसएफ जवानाचा उलटीमुळे मृत्यू झाला. उलटी माघाली श्वासनलिकेत गेल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
राजस्थानच्या जैसलमेर जिल्हा मुख्यालयातील हॉटेलमध्ये शनिवारी एका बीएसएफ जवानाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात जवानाला दारू पिऊन उलट्या झाल्याचं समोर आलं. मात्र त्यानं तोंड रुमालानं झाकले होतं त्यामुळे उलटी पुन्हा विंडपाइपमध्ये अडकली आणि जावानाचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. हा सैनिक यूपीचा रहिवासी होता.
advertisement
जवान आदर्श कुमार राय (43) हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील कांकरोली येथील रहिवासी होते. आदर्श कुमार हे जैसलमेर येथील दाबला बीएसएफमध्ये ड्युटीवर तैनात होते. शनिवारी रात्री घरी जाण्यासाठी सुटी घेऊन निघाले होते. मात्र ट्रेन रात्री उशिरा असल्यानं त्यांनी रेल्वे स्थानकासमोरील हॉटेलमध्ये मुक्काम केला. आदर्शने हॉटेलच्या खोलीत दारू प्यायली.
advertisement
शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, त्यादरम्यान शिपायाला उलट्या झाल्या. यावर त्यानं रुमालानं तोंड बंद केलं. त्यामुळे उलटी पुन्हा जवानाच्या विंडपाइपमध्ये गेली. त्यामुळे श्वसनमार्गात अडथळा निर्माण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा. ट्रेनची वेळ होऊनही जवान खोलीतून बाहेर न आल्यानं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेरून वारंवार बोलावलं. पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. यावर हॉटेल कर्मचाऱ्यांनी जैसलमेर पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी रुमचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये जवान मृत दिसला.
view comments
मराठी बातम्या/देश/
उलटी माघारी श्वासनलिकेत गेल्यामुळे BSF जवानाचा मृत्यू, नेमकी काय झाली चूक?
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement