Bus Fire: 32 लोक जळाले, 18 वाचले पण त्या बस चालकाचं आणि क्लिनरचं काय झालं?

Last Updated:

कुरनूलजवळ कावेरी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागून ३२ प्रवासी मृत्युमुखी पडले, १८ जण बचावले. चालक फरार असून डीएनए तपासणीसाठी फॉरेन्सिक टीम्स पाचारण.

News18
News18
पहाटे तीन वाजता सुस्साट खासगी बस नॅशनल हायवेवरुन निघाली होती, अचानक दुचाकीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, बाइक थेट फ्यूल टँकमध्ये घुसली. त्यानंतर पुढच्याच क्षणी चिंगारी उडावी तशी ठिणगी पडली आणि आग लागली. शॉर्ट सर्किट झालं आणि पुढच्याच क्षणी बसने पेट घेतला. पहाटेची वेळ असल्यानं प्रवासी साखरझोपेत होते. हे सगळं इतक्या पटकन घडलं की प्रवाशांना उठून स्वत: चा जीव वाचवताही येणं कठीण होतं.
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. चिनाटेकुर गावाजवळ शुक्रवारी पहाटे ३:३० वाजता हैदराबादहून बंगळूरकडे जाणाऱ्या 'कावेरी ट्रॅव्हल्स' च्या एका खासगी बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ३२ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बसखाली दुचाकी फसल्याने झाला स्फोट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आणि दुचाकीच्या धडकेनंतर दुचाकी फ्यूल टँकमध्ये घुसली. याच कारणामुळे बसचा स्फोट झाला आणि बसने क्षणार्धात पेट घेतला. आग इतकी भयंकर होती की, बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अपघात झाला तेव्हा बहुतेक प्रवासी गाढ झोपेत होते. काही प्रवाशांनी खिडक्या तोडून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण अनेक लोक आतच अडकले आणि होरपळून त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
32 प्रवाशांचा मृत्यू 18 जण बचावले
कुरनूल जिल्हाधिकारी डॉ. ए. सिरी यांनी या घटनेची माहिती दिली. बसमध्ये एकूण ४१ प्रवासी प्रवास करत होते. यापैकी केवळ १८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर लगेचच स्थानिक लोकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला. कुरनूलमधून अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवली, पण तोपर्यंत बस पूर्णपणे राख झाली होती. जखमींना कुरनूल येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासानुसार, मृत झालेले बहुतेक प्रवासी हे हैदराबादचे रहिवासी होते.
advertisement
बस चालक फरार; डीएनए तपासणीची गरज
हा अपघात घडताच बसचालक घटनास्थळावरून पळून गेले असून, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. अपघाताचे प्राथमिक कारण चालकाची निष्काळजी वृत्ती आणि इंधन गळतीमुळे लागलेली आग हे असल्याचे सांगितले जात आहे. दुर्घटनेत मृत झालेल्या ११ जणांची ओळख पटली आहे, मात्र उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक टीम्सला पाचारण करण्यात आले आहे. गरज भासल्यास डीएनए तपासणी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Bus Fire: 32 लोक जळाले, 18 वाचले पण त्या बस चालकाचं आणि क्लिनरचं काय झालं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement