Gemstone Love Life: रिलेशन्स-नातीगोती भक्कम करणारी ही 4 रत्नं; बोटात धारण करणारे आपोआप...

Last Updated:

Gemology Astro: काही रत्ने धारण केल्यानं जीवनात प्रेम, समजूतदारपणा आणि सकारात्मकता वाढते. भावनिक ओढ वाढते आणि प्रेमाचे नाते दृढ होते. लव्ह लाईफमधील सर्व अडचणी दूर होतात आणि प्रेम जीवनात गोडवा येतो.

News18
News18
मुंबई : लव्ह लाईफपासून ते वैवाहिक जीवनातील अडचणींमधून मुक्त होण्यासाठी काही रत्ने धारण करण्याबद्दल ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलं जातं. ही रत्ने प्रेम जीवनात आनंद आणि सुसंवाद आणण्यासाठी खूप मदत करतात. अशी 4 रत्ने आहेत जी धारण केल्यानं जीवनात प्रेम, समजूतदारपणा आणि सकारात्मकता वाढते. भावनिक ओढ वाढते आणि प्रेमाचे नाते दृढ होते. लव्ह लाईफमधील सर्व अडचणी दूर होतात आणि प्रेम जीवनात गोडवा येतो. वैवाहिक जीवनात सुख आणि शांती मिळते. त्या रत्नांविषयी जाणून घेऊया.
रोज क्वार्ट्ज स्टोन (Rose Quartz Stone) -
गुलाबी रंगाचे रोज क्वार्ट्ज स्टोन प्रेम संबंधांसाठी जणू औषधाप्रमाणे काम करतं. नात्यातून सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि प्रेम व रोमान्स वाढायला लागतो. तुम्ही रोज क्वार्ट्जचा तुकडा जवळ ठेवू शकता, अंगठी किंवा गळ्यात धारण करू शकता. हे रत्न धारण केल्याने नात्यात आदर वाढतो.
advertisement
गार्नेट (रक्तमणी - Garnet) -
गडद लाल रंगाचा गार्नेट स्टोन उत्साह आणि विश्वासाचा कारक आहे. नात्यात प्रेम वाढवण्यासाठी आणि ते जागृत ठेवण्यासाठी गार्नेट खूप प्रभावीपणे काम करतं. नात्यात रोमांच कायम राहतो. कपलला नात्यात त्यांना काय हवं आहे आणि नातं कसं सुधारता येईल, हे समजून घेता येतं. जोडीदारांमध्ये नात्यात मजबूती आणि विश्वास वाढतो.
advertisement
सिट्रीन (सुनहला रत्न - Citrine Stone) -
पिवळ्या रंगाचे सिट्रीन स्टोन (सुनहला रत्न) धारण केल्याने नात्यात सकारात्मकता येते आणि आनंद वाढतो. लव्ह लाईफमध्ये ऊर्जेचा संचार होतो. हे रत्न घरातही सुख-समृद्धी आणतं. सिट्रीन रत्न नात्याला खोलवर नेतं आणि आत्मविश्वास वाढवतं. नात्यात येणारी आव्हाने दूर होतात आणि शांती टिकून राहते.
एमेथिस्ट (जमुनिया रत्न - Amethyst Stone) -
advertisement
एमेथिस्ट स्टोन (जमुनिया रत्न) धारण केल्याने वैवाहिक जीवनात संतुलन येतं आणि भावनिक स्तरावर अधिक छान वाटू लागतं. एमेथिस्ट म्हणजेच जमुनिया रत्न धारण केल्यानं नात्यात समजूतदारपणा वाढतो आणि गैरसमज दूर होतात. लव्ह लाईफ सुधारते आणि सुखात वाढ होते. शांती आणि आनंद येतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Gemstone Love Life: रिलेशन्स-नातीगोती भक्कम करणारी ही 4 रत्नं; बोटात धारण करणारे आपोआप...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement