२५ बँक खाती, साडे तीन किलो सोनं, १ कोटींची रोकड सापडली, IRS अधिकाऱ्यावर CBI ची मोठी कारवाई

Last Updated:

Amit kumar Singhal: आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंघल यांच्यावरील कारवाईनंतर सीबीआयने अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली.

सीबीआय
सीबीआय
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागा अर्थात सीबीआयने आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंघल यांना रंगेहाथ लाच स्वीकारताना अटक केली. फूड फ्रेंचाइजी पिनोसचे मालक सनम कपूर यांनी आयआरएस अधिकारी सिंघल यांच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार केली होती. त्यानंतर सापळा रचून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मध्यस्थाच्या मदतीने ४५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयच्या टीमने अटक केली आहे.  पिनोसच्या मालकाने दावा केला होता की, त्यांच्या कंपनीच्या मालकांमध्ये वाद झाल्यानंतर त्यांना नोटीस पाठवून त्रास दिला जात आहे.
सीबीआयने केलेल्या शोध मोहिमेदरम्यान २५ बँक खाती आणि लॉकर देखील सापडले आहेत. विविध बँकांमधील खात्यांचे कागदपत्रे आणि एक लॉकर सापडले. सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरनुसार, आरोपी अधिकारी अमित कुमार सिंघल यांनी ४५ लाख रुपयांची बेकायदेशीर वसुली मागितल्याचा आरोप करण्यात आला. धमकी देऊन खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आयकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून लाच मागितली गेल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
advertisement
सिंघल यांच्यावरील कारवाईनंतर सीबीआयने अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली. सीबीआयच्या शोध मोहिमेत सुमारे ३.५ किलो सोने, २ किलो चांदी आणि १ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सिंघल २००७ बॅचचे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. सध्या नवी दिल्लीत एडीजी म्हणून कार्यरत. सीबीआयच्या तपासात सिंघल यांच्याकडे मोठी मालमत्ता उघडकीस आली आहे. दिल्ली, मुंबई आणि पंजाबमध्ये असलेल्या जंगम आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत.
मराठी बातम्या/देश/
२५ बँक खाती, साडे तीन किलो सोनं, १ कोटींची रोकड सापडली, IRS अधिकाऱ्यावर CBI ची मोठी कारवाई
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement