Chhangur Baba:'छांगूर बाबा'च्या पापाचा घडा भरला! ईडीकडून 14 ठिकाणी छापे, मुंबईतील 2 ठिकाणी कारवाई
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Chhangur Baba Latest News: आज देशभरात ईडीने या प्रकरणाशी संबंधित असलेल्या 14 ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. यामध्ये मुंबईतील दोन ठिकाणांचा समावेश आहे.
मुंबई: उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये अटक झालेल्या छांगूर बाबा ऊर्फ जमालुद्दीनच्या धर्मांतर रॅकेट प्रकरणात आता सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीची एन्ट्री झाली आहे. आज देशभरात ईडीने या प्रकरणाशी संबंधित असलेल्या 14 ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. यामध्ये मुंबईतील दोन ठिकाणांचा समावेश आहे.
छांगूर बाबा ऊर्फ जमालुद्दीन हा धर्मांतर करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या बाबाला परदेशातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला असल्याचे तपासात समोर आले. या छांगूर बाबाला परदेशातून जवळपास 500 कोटींचा निधी मिळाला असल्याचे म्हटले जात आहे. आता, या प्रकरणात ईडीने उत्तर प्रदेशातील बलरामपूरसह मुंबईतही छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत वांद्रे आणि माहीम परिसरात ही छापेमारीची कारवाई करण्यात आली.
advertisement
बलरामपूर जिल्ह्यातील उत्तरौला, मधुपूर गाव आणि रेहरमफी गावातील 12 ठिकाणी ईडीने छापे टाकले. याशिवाय, मुंबईतील शहजाद शेखच्या दोन ठिकाणीही छापे टाकण्यात आले. तपासात असे दिसून आले आहे की शहजाद शेखच्या बँक खात्यात 1 कोटी रुपये आले होते, जे नंतर इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. ईडी या रकमेचा स्रोत आणि त्याचा वापर तपासत आहे.
advertisement
मनी लाँड्रिंग आणि आमिषं दाखवून धर्मांतरणाचा प्रकार...
जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा याच्यावर परदेशी निधीद्वारे बेकायदेशीर धर्मांतराचे मोठे नेटवर्क चालवल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तक्रारीच्या आधारे, ईडीने 9 जुलै रोजी मनी लाँड्रिंग अंतर्गत अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) नोंदवला. तपासात असे दिसून आले आहे की छांगूर बाबाला मध्य पूर्वेकडून 40 हून अधिक बँक खात्यांमध्ये सुमारे 106 कोटी रुपये मिळाले होते, जे धर्मांतर आणि इतर बेकायदेशीर कामांमध्ये वापरले गेले.
advertisement
इतर संबंधित बातमी:
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 17, 2025 10:26 AM IST
मराठी बातम्या/देश/
Chhangur Baba:'छांगूर बाबा'च्या पापाचा घडा भरला! ईडीकडून 14 ठिकाणी छापे, मुंबईतील 2 ठिकाणी कारवाई