पाकिस्तानात मला घरासारखं वाटलं, सॅम पित्रोदांच्या काँग्रेस पुन्हा अडचणीत; भाजपच्या हाती आयते कोलीत

Last Updated:

Sam Pitroda News: बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे परराष्ट्र सल्लागार सॅम पित्रोदा यांच्या पाकिस्तानवरील वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “पाकिस्तानमध्ये घरासारखं वाटलं” या विधानावर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी बिहार निवडणुकीपूर्वी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पित्रोदा म्हणाले की- त्यांना पाकिस्तानमध्ये 'घरासारखं' वाटलं. या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
advertisement
सॅम पित्रोदा यांचं नेमकं वक्तव्य काय?
सॅम पित्रोदा हे राहुल गांधींच्या जवळचे मानले जातात. त्यांनी परराष्ट्र धोरणाबाबत आपलं मत मांडलं. ते म्हणाले, 'माझ्या मते, आपलं परराष्ट्र धोरण सर्वात आधी आपल्या शेजाऱ्यांवर केंद्रीत असावं. आपण आपल्या शेजारी देशांसोबतचे संबंध खरोखरच सुधारू शकतो का?
advertisement
पित्रोदांनी पुढे त्यांच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्या भेटींबद्दल सांगितलं. 'मी पाकिस्तानमध्ये गेलो होतो आणि तुम्हाला सांगतो, मला तिथे घरासारखं वाटलं. मी बांगलादेशात गेलो, नेपाळमध्ये गेलो, आणि मला घरासारखं वाटलं. मला असं अजिबात वाटलं नाही की मी कोणत्या परदेशी देशात आहे.'
advertisement
भाजपला मिळाली संधी
भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सॅम पित्रोदा यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. 'राहुल गांधींचे लाडके आणि काँग्रेसचे परराष्ट्र प्रमुख सॅम पित्रोदा म्हणतात की त्यांना पाकिस्तानमध्ये 'घरासारखं' वाटलं. त्यामुळेच 26/11 च्या हल्ल्यानंतरही यूपीए सरकारने पाकिस्तानवर कोणतीही कठोर कारवाई केली नाही यात आश्चर्य नाही. पाकिस्तानचा लाडका, काँग्रेसने निवडलेला.'
advertisement
भाजप या वक्तव्याचा वापर आगामी बिहार निवडणुकीत एक मोठा मुद्दा म्हणून करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पित्रोदा आणि गांधी कुटुंब
सॅम पित्रोदा हे गांधी कुटुंबाचे जुने आणि विश्वासार्ह सल्लागार मानले जातात. 1980 च्या दशकात ते राजीव गांधींच्या जवळचे टेक्नोक्रेट म्हणून उदयास आले. राहुल गांधींच्या ते विशेष जवळचे आहेत. यापूर्वीही त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. फेब्रुवारी महिन्यात भारत आणि चीनमध्ये तणाव असताना त्यांनी म्हटलं होतं की भारत चीनच्या धोक्याला जास्तच वाढवून सांगतो आहे.
advertisement
चीनबाबत काय म्हणाले होते?
एका मुलाखतीत सॅम पित्रोदा यांनी म्हटलं होतं की, 'मी चीनच्या धोक्याला समजू शकत नाही. मला वाटतं की या मुद्द्याला अनेकदा वाढवून सांगितलं जातं, कारण अमेरिकेची शत्रूंना परिभाषित करण्याची प्रवृत्ती आहे.'
ते म्हणाले, मला वाटतं की आता वेळ आली आहे की सर्व देशांनी एकमेकांशी सहयोग करावा, संघर्ष करू नये. आपला दृष्टिकोन सुरुवातीपासूनच संघर्षमय राहिला आहे आणि हीच वृत्ती शत्रू निर्माण करते. आपल्याला ही मानसिकता बदलावी लागेल आणि चीन पहिल्या दिवसापासून शत्रू आहे हे मानणं थांबवावं लागेल.
advertisement
सॅम पित्रोदा यांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला अनेकदा बचावात्मक भूमिका घ्यावी लागली आहे आणि विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली आहे. आता यावेळी देखील पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे भाजपला टीका करण्याची संधी मिळाली आहे.
मराठी बातम्या/देश/
पाकिस्तानात मला घरासारखं वाटलं, सॅम पित्रोदांच्या काँग्रेस पुन्हा अडचणीत; भाजपच्या हाती आयते कोलीत
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement