#किस्से निवडणुकीचे : इंदिरा गांधींसाठी केलं विमान हायजॅक, काँग्रेसने दिलं 7 वेळा तिकिट, तरीसुद्धा..

Last Updated:

ही घटना 1978 ची आहे. आणीबाणीनंतर देशात जनता पार्टीचे सरकार आहे. सरकार तयार झाल्यानंतर 19 डिसेंबर 1978 रोजी मोरारजी देसाईंच्या सरकारने माजी पंतप्रधान प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना अटक करण्याचे आदेश दिले होते.

किस्से निवडणुकीचे
किस्से निवडणुकीचे
सनन्दन उपाध्याय, प्रतिनिधी
बलिया : सध्या लोकसभेची रणधुमाळी सर्वत्र पाहायला मिळत आहे. आज अशाच एक कार्यकर्त्याची कथा आपण जाणून घेणार आहोत. ही कथा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
ही घटना 1978 ची आहे. आणीबाणीनंतर देशात जनता पार्टीचे सरकार आहे. सरकार तयार झाल्यानंतर 19 डिसेंबर 1978 रोजी मोरारजी देसाईंच्या सरकारने माजी पंतप्रधान प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. याच्या विरोधात बलियाचे काँग्रेस नेता डॉ. भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे यांनी दिल्ली येथील पालम विमानतळापासून येथून इंडियन एअरलाइन्स 410 चे अपहरण केले. आपल्या नेत्या इंदिरा गांधींची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी बलिया येथील तरुण भोला पांडे यांनी लहान मुलांच्या खेळण्याच्या बंदूकीचा धाक दाखवून विमानाला हायजॅक केले.
advertisement
तसेच केंद्र सरकारच्या जनता पार्टीच्या सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच इंदिरा गांधींची तुरुंगातून सुटका करण्यात यावी आणि संजय गांधी यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जावे, यासाठी हे विमान हायजॅक केले होते. बलिया जिल्ह्यातील मुनिछपरा येथील रहिवासी असलेल्या यूथ काँग्रेसचे नेते डॉ. भोलानाथ पांडे यांनी आपले मित्र देवेंद्र पांडे यांच्या मदतीने हे काम केले होते.
advertisement
heatstroke : उन्हाळ्यात वाढला आजारांचा धोका, या गोष्टी ठरतील शरीराला खूपच फायदेशीर
या विमानाचे अपहरण करून भोला पांडे हे या विमानाला नेपाळमार्गे बांग्लादेशला घेऊन जाऊ इच्छित होते. मात्र, विमानातील इंधन संपल्याने या विमानाला वाराणसीत लँड करण्यात आले. या विमान अपहरणाची सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे भोला पांडे यांच्याकडे कोणतेही हत्यार नव्हते आणि यासोबतच विमानात बसलेल्या प्रवाशांची जीवित किंवा मालमत्तेची हानी होऊ शकेल अशी कोणतीही वस्तू नव्हती. भोला पांडेने प्लेन हायजॅक करण्यासाठी टॉय गन आणि क्रिकेट बॉलचा वापर केला होता, असेही ते म्हणाले.
advertisement
इतिहासकार डॉ. शिवकुमार सिंह कौशिकेय यांनी लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, सलेमपूर लोकसभा मतदारसंघातून इंडियन नॅशनल काँग्रेसने डॉ. भोलानाथ पाण्डेय यांना 1991,1996,1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये म्हणजे तब्बल 7 वेळा तिकीट दिले होते. मात्र, तरीही एकही निवडणूकमध्ये ते जिंकले आले नाही. जिल्ह्यात आजही जिल्ह्यात लोकं याबाबत चर्चा करतात की, नेता असावा तर असा असावा जो आपल्या पक्षाच्या नेत्यासाठी काहीही करायला तयार असावा.
advertisement
खासदार न बनल्याचे दु:ख -
वर्ष 1984 मध्ये सत्तेत परतल्यानंतर भोला पांडे आणि देवेंद्र पांडे हे काँग्रेसचे प्रांतीय/राष्ट्रीय सचिव आणि आमदार बनले. दिवंगत राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी डॉ. भोलानाथ पाण्डेय यांना खासदार बनवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, सलेमपूरच्या जनतेने त्यांना कधीही संधी नाही दिली.
view comments
मराठी बातम्या/देश/
#किस्से निवडणुकीचे : इंदिरा गांधींसाठी केलं विमान हायजॅक, काँग्रेसने दिलं 7 वेळा तिकिट, तरीसुद्धा..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement