Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचे बांधकाम आणखी लांबले, नवीन तारीख समोर, नेमका का होतोय उशीर?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचे बांधकाम हे 3 टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्याचे बांधकाम हे 22 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण झाले होते. त्याच दिवशी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली होती. दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम जवळपास आता पूर्ण होणार आहे. म्हणजे एकूण 60 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर प्रत्येक दिवशी लाखो भाविक मंदिरात दर्शन घेत आहेत. पण राम मंदिराचे संपूर्ण बांधकाम कधी पूर्ण होणार असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे. पण राम मंदिराच्या बांधकाम आणखी वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. राम मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार होते. मात्र, आता जून 2025 पर्यंत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार आहे.
advertisement
राम मंदिराचे बांधकाम हे 3 टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्याचे बांधकाम हे 22 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण झाले होते. त्याच दिवशी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली होती. दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम जवळपास आता पूर्ण होणार आहे. म्हणजे एकूण 60 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
यानंतर आता राम मंदिरासोबतच श्री राम आंतरराष्ट्रीय संग्रहालयही 2025 मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. एकीकडे संपूर्ण मंदिराचे बांधकाम 30 जून 2025 पर्यंत पूर्ण होईल. तर दुसरीकडे श्री राम आंतरराष्ट्रीय संग्रहालयाचे बांधकामही सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल.
advertisement
मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष निपेंद्र मिश्रा म्हणाले की, पूर्वी बांधकाम पूर्ण करण्याची अंतिम मुदत डिसेंबर 2024 निश्चित करण्यात आली होती. परंतु आता जून 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. घाई केली तर बांधकामाचा दर्जा घसरतो, असे मंदिराच्या बांधकामाशी संबंधित यंत्रणांचे म्हणणे आहे.
advertisement
त्यामुळे राम मंदिर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मार्च 2025 पर्यंत ठेवण्यात आले होते. ते आता जून 2025 पर्यंत वाढवण्यात आले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय राम कथा संग्रहालयाचे बांधकामही सुरू आहे. त्याचे बांधकामही सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
November 25, 2024 7:22 PM IST
मराठी बातम्या/देश/
Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचे बांधकाम आणखी लांबले, नवीन तारीख समोर, नेमका का होतोय उशीर?